IPL 2022, Orange cap : जॉस बटलरची तुफान खेळी, ऑरेंज कॅपवर पकड कायम, तुमचा आवडता खेळाडू कुठे? जाणून घ्या…
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) सलामीचा फलंदाज जॉस बटलरनं (Jos Buttler) त्याच्या तुफानी खेळीनं चांगल प्रदर्शन केलंच. पण त्याने अजूनही आपलं वर्चस्व ऑरेंज कॅपवर (Orange cap) कायम ठेवलं आहे. बटलरच्या यशामागचं एक मुख्य कारण म्हणजे त्याने तो सर्वाधिक वेळा टॉपमध्ये राहिलाय. त्याची बरोबरी करणारा स्पर्ध कुणीही त्याच्या जवळही नाही पोहचू शकला. मंगळवारी गुजरात विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा बटलरचा अनोखा अंदाज दिसून आला. पण, त्याला तरीही आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. आता एकीकडे संघाला विजय मिळवता आला नसला तरी बटलर ऑरेंज कॅपवर आपलं वर्चस्व जमवून आहे. आयपीएलच्या फलंदाजांसाठी ऑरेंज कॅपचं मोठं महत्व आहे. हा तो मान आहे. ज्याला मिळवून खेळाडू आपलं खेळातील स्थान दाखवून देतात, आपली कामगिरीही उंचावतात. सर्वाधिक धावा काढणाऱ्याला ऑरेंज कॅप दिली जाते.
बटलरची तुफानी खेळी
फाईनलच्या तिकीटासाठी मंगळवारी राजस्थानचा सामना गुजरात टायटन्ससोबत झाला. बटलरची तुफानी खेळी सामन्यात दिसून आली. त्याने 56 चंडूत 89 धावा काढल्या. विशेष म्हणजे सगळीकडे पहिला वहिल्या असलेल्या बटरलनं बारा चौकार मारले आणि दोन षटकार मारले आहेत. यात रनआऊट झाल्यानंतर तो या सीजनमधील चौथं शतक करण्यापासून रोखला गेला. नाहीतर बटलरचं या सामन्यातील हे चौथं शतक झालं असतं. मागच्या काही सामन्यांपासून बटलरची फलंदाजी थंड होती. अशात बटलरची ही फलंदाजी त्याच्या जुन्या फॉममध्ये पुन्हा परतण्याचे संकेत आहेत.
ऑरेंज कॅपवर बटलर’राज’ कायम
बटलरनं पंधरा सामन्यात 718 धावा काढल्या आहेत. यादरम्याने त्याने तीन शतक आणि चार अर्धशतक केले आहेत. त्याची जोरदार खेळीत 39 षटकार पण आहेत. जॉस बटलरला टक्कर देणारे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा आता बराच मागे आहे. चौदा सामन्यात राहुलने 537 धावा केल्या आहेत. राहुलने देखील दोन शकत लगावले आहेत. त्यानं 25 षटकार लगावले आहेत.
ऑरेंज कॅपचा टेबल
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.