K L Rahul | केएल राहुल याचं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक, नेदरलँड्स विरुद्ध वादळी खेळी
K L Rahul Century | श्रेयस अय्यर याच्यानंतर केएल राहुल यानेही नेदरलँड्स विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं. टीम इंडियाने या दोघांच्या शतकाच्या जोरावर 400 पार मजल मारली.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली आहे. श्रेयस अय्यर याच्यानंतर टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन लोकल बॉय केएल राहुल याने शतक पूर्ण केलं आहे. केएल याचं वर्ल्ड कपमधील हे पहिलंवहिलं शतक साजरं केलं. तसेच केएलच्या वनडे करिअरमधील हे एकूण सातवं शतक ठरलं. विशेष म्हणजे केएलने वर्ल्ड कपमधील पहिल्याच शतकासह विक्रमही केला. केएल या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला.
केएलने सलग 2 सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. केएल अवघ्या 62 बॉलच्या मदतीने शतक झळकावलं. केएलने 162.90 च्या स्ट्राईर रेटने 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. मात्र केएल शतकानंतर आऊट झाला. केएलने 64 बॉलमध्ये 11 फोर आणि 4 सिक्ससह 102 धावा केल्या. केएलआधी श्रेयस अय्यर यानेही वर्ल्ड कपमधील पहिलंवहिलं शतक साजरं केलं. श्रेयसने 84 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
नेदरलँड्सला 411 धावांचं आव्हान
दरम्यान टीम इंडियाने नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 410 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 61 रन्स केल्या. शुबमन गिल आणि विराट कोहली दोघांनी प्रत्येकी 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अखेरीस केएल आणि श्रेयस या दोघांनी शतकं ठोकली. त्यामुळे टीम इंडियाला 400 पार मजल मारता आली. श्रेयसने नाबाद 128 धावांची खेळी केली. तर केएल राहुल 102 धावा करुन माघारी परतला. सूर्यकुमार यादव 2 धावांवर नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीक आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. तर बास डी लीडे याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची तोडफोड बॅटिंग
Innings Break!
A batting display full of fireworks as centuries from Shreyas Iyer & KL Rahul light up Chinnaswamy 💥#TeamIndia post 410/4 in the first innings 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/eYeIDYrJum
— BCCI (@BCCI) November 12, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.