South Africa tour | 30 वर्षीय खेळाडूकडे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी, कोण आहे तो?

South Africa Tour | टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाचा हा पहिलाच विदेश दौरा असणार आहे.

South Africa tour | 30 वर्षीय खेळाडूकडे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी, कोण आहे तो?
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयने 6 खेळाडूंची कसोटी मालिकेसाठी निवड केली नाही. त्यामुळे त्या 6 खेळाडूंच्या टेस्ट करिअरला ब्रेक लागल्याचं म्हटलं जात आहे. ते कोण आहेत, आपण जाणून घेऊयात.
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 2:31 PM

मुंबई | दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार असणार आहेत. टी 20 आणि वनडे मालिकेत प्रत्येकी एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 2 सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. हा दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान टीम इंडिया ए टीम दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 4 दिवसीय 2 सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यामध्ये टीम इंडिया ए चं नेतृत्व हे 5 कसोटी सामने खेळलेला खेळाडू करणार आहे.

आंध्रप्रदेशचा विकेटकीपर बॅट्समन केएस भरत हा टीम इंडिया एचं नेतृत्व करणार आहे. केएस भरत याने टीम इंडियाकडून 5 कसोटी सामने खेळले आहेत. हाच केएस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये होता. बीसीसीआयने या दोन्ही सराव सामन्यांसाठी 2 वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. मात्र या दोन्ही संघांमध्ये कॅप्टन केएससह साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, मानव सुथार आणि वी कावेरप्पा यांचा समावेश आहे.

ईश्वरन याला संधी देण्यात आली आहे. मात्र तो फिट असेल तरच त्याला खेळण्याची संधी मिळणार आहे. कर्नाटकातील देवदत्त पडीक्क्ल हा पहिल्या सराव साम्नयात खेळणार आहे. तसेच सरफराज खान, कल्याणचा तुषार देशपांडे आणि प्रसिध कृष्णा हे देखील पहिल्या सामन्यात असणार आहे. पहिला सामना 11 ते 14 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

दुसऱ्या सामन्यात कोण?

तर दुसरा सराव सामना हा 26 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, तिलक वर्मा आणि नवदीप सैनी खेळणार आहेत. तसेच बीसीसीआयने 20 ते 22 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 3 दिवसीय सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आलेला आहे.

पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया ए | केएस भरत (कॅप्टन), साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पड्डिकल, प्रदोष रंजन पॉल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकुर, पुलकित नारंग, सौरभ कुमार, मानव सुतार, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, वी कावेरप्पा आणि तुषार देशपांडे.

दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या दुसऱ्या 4 दिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया ए | केएस भरत (कर्णधार), साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, मानव सुतार, आकाश दीप, वी कावेरप्पा आणि नवदीप सैनी.

3 दिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया ए | रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पड्डिकल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत, ध्रुव जुरेल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, पुलकित नारंग, हर्षित राणा, शार्दुल ठाकुर, सौरभ कुमार, मानव सुतार, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, वी कावेरप्पा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.