Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs NZ : कामिंदु मेंडीस याचा वर्ल्ड रेकॉर्ड, 147 वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास बदलला

Kamindu Mendis World Record: श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंदु मेंडीस याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कामिंदुने अवघ्या 8 व्या सामन्यातच हा धमाका केलाय.

SL vs NZ : कामिंदु मेंडीस याचा वर्ल्ड रेकॉर्ड, 147 वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास बदलला
Kamindu Mendis Sri LankaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 8:11 PM

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात गॉल क्रिकेट स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिला दिवस श्रीलंकेने गाजवला. श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंदु मेंडीस याने या सामन्यातही आपला झंझावात कायम राखत खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे. कामिंदुने या अर्धशतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मेंडीस पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 56 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. कामिंदुने यासह पदार्पणापासून ते आतापर्यंत सलग 8 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणत्याच फलंदाजाला जमली नाही.

कामिंदुने न्यूझीलंड विरुद्ध वनडे स्टाईल अर्धशतक पूर्ण केलं. कामिंदुने अर्धशतकी खेळी दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. कामिंदुने अवघ्या 53 चेंडूत अर्धशतक झळकावलं. कामिंदु पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 51 धावांवर नाबाद होता. कामिंदुने यासह पदार्पणापासून सलग 8 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पाकिस्तानच्या सौद शकील याचा विक्रम मोडीत काढला. सौद शकील याने इंग्लंड विरुद्ध 2022 मध्ये रावळपिंडी येथे कसोटी पदार्पण केलं होतं. सौदने पदार्पणापासून सलग 7 डावांमध्ये अर्धशतकी खेळी केल होती. आता कामिंदुने त्याला मागे टाकलंय.

सामन्याचा धावता आढावा

टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. ओपनर पाथुम निसांका 1 धावा करुन बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी दिनेश चांदीमल आणि दिमुथ करुणारत्ने या जोडीने शतकी भागीदारी केली. करुणारत्ने याने 109 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. तर दिनेश चांदीमलने कसोटी क्रिकेटमधील 16 वं शतक झळकावलं. दिनेशने 116 धावांची खेळी केली. त्यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि कामिंदु मेंडीस या दौघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत श्रीलंकेला 300 पार पोहचवलं. श्रीलंकेने खेळ संपेपर्यंत 90 ओव्हरमध्ये 3 विकेट्स 306 धावा केल्या. अँजलो मॅथ्यूज 78 आणि कामिंदु मेंडीस 51 धावांवर नाबाद आहेत.

कामिंदू मेंडीस याचा वर्ल्ड रेकॉर्ड

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.