IND vs NZ : केन विल्यमसन पराभवानंतर थोडक्यात पण खूप काही बोलला, हरलो असलो तरी…

IND vs NZ Semi Final : भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 70 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर केन विल्यमसनने आपली प्रतिक्रिया दिली.

IND vs NZ : केन विल्यमसन पराभवानंतर थोडक्यात पण खूप काही बोलला, हरलो असलो तरी...
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 1:01 AM

मुंबई : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 70 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयल अय्यर यांच्या शतकाच्या जोरावर 397 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करतावा किवींचा संघ  327 धावांवर ऑल आऊट झाला. मोहम्मद शमी याने एकट्याने सात विकेट घेत सामना फिरवला आणि भारतीय संघाचं फायनलचं तिकीट पक्क केलं. या सामन्यानंतर बोलताना न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाला केन विल्यमनसन?

सर्वात प्रथम भारतीय संघाचं अभिनंदन, एकमद शानदार खेळ करत ते टॉपच्या संघासारखं साजेसं खेळले. शेवटपर्यंत आमच्या संघातील खेळाडू लढले याचा अभिमाना वाटतो. भारताच्या वर्ल्ड क्लास फलंदाजांनी कडक फलंदाजी केली, बॉल स्विंग होत असल्याने कठीण होतं तरीपण ते 400 पर्यंत पोहोचले. भारतात खेळल्याचा आम्हालाही आनंद आहे. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिशेल हे स्पेशल आहेत त्यांनी उत्तम खेळ केल्याचं केन आपल्या खास शैलीत म्हणजेच स्माईल करत बोलला.

आजच्या सामन्यात विराट कोहली याने वन डे मधील 50 वं शतक करत मोठा विक्रम रचला. सचिन तेंडुलकर याच्या एक पाऊल तो पुढे गेला आहे. युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने सलग दुसरं शतक करत महत्त्वाची कामगिरी केली. श्रेयसने अवघ्या 70 बॉलमध्ये 105 धावा करत 400 च्या दिशेने वाटचाल करून दिली.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.