IPL 2023 : देशापेक्षा ‘या’ 4 प्लेयर्ससाठी IPL स्पर्धा मोठी, कॅप्टनच स्वत: नाही खेळणार

| Updated on: Mar 14, 2023 | 1:16 PM

IPL 2023 : देश नाही, पैसा मोठा या खेळाडूंनी तेच दाखवून दिलय. देशासाठी खेळण्याऐवजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मोठे खेळाडू आयपीएलला प्राधान्य देतात. त्यामागे कारण असतो पैसा.

IPL 2023 : देशापेक्षा या 4 प्लेयर्ससाठी IPL स्पर्धा मोठी, कॅप्टनच स्वत: नाही खेळणार
IPL 2023
Follow us on

IPL 2023 News : ख्राइस्टचर्च टेस्टमध्ये नाबाद शतक झळकवून कॅप्टन केन विलियमसनने न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध दोन विकेटने विजय मिळवून दिला. तोच विलियमसन आता दुसऱ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या शतकी खेळीनंतर 24 तासांनी न्यूझीलंडच्या वनडे टीमची घोषणा झाली आहे. त्यात कॅप्टन केन विलियमसनच नाव नाहीय. फक्त विलियमसनच नाही, टिम साऊदी, डेवन कॉनवे आणि मिचेल सँटनर हे तीन खेळाडू सुद्धा स्क्वाडचा भाग नाहीयत.

न्यूझीलंडने मंगळवारी वनडे टीमची घोषणा केली. टॉम लॅथमची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीय. नियमित कॅप्टन केन विलियमसन वनडे सीरीज ऐवजी आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसेल.

तीन खेळाडू आयपीएलसाठी टीमची साथ सोडणार

टिम साऊदी, ड्वेन कॉनवे आणि मिचेल सँटनर सुद्धा आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. न्यूझीलंडचे आणखी तीन प्लेयर श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळल्यानतंर आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार आहेत.

किती खेळाडू भारतात येणार?

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कॅप्टन केन विलियमसनसह चार खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध वनडे, टी 20 सीरीजऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. विलियमसन गुजरात टायटन्सचा भाग आहे. टिम साऊदी केकेआर, डेवन कॉनवे आणि मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहेत.

25 मार्चला ऑकलंडमध्ये पहिला वनडे सामना होईल. त्यानंतर फिन एलेन, लॉकी फर्ग्युसन आणि ग्लेन फिलिप्स भारतासाठी रवाना होतील. फिन एलेन रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळतो. लॉकी फर्ग्युसन केकेआर आणि मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे.


वनडे टीमची घोषणा

विलियमसनच्या अनुउपस्थितीत न्यूझीलंडच नेतृत्व टॉम लॅथमकडे आहे. दुसऱ्या वनडेआधी तीन खेळाडू मार्क चॅपमॅन, बेन लिस्ट आणि हेनरी निकल्स टीममध्ये सहभागी होतील. वनडे टीममध्ये टॉम ब्लंडेल आणि विल यंग यांचा समावेश झालाय. बोवेस आणि बेन लिस्टर यांना पहिल्यांदा किवी टीममध्ये स्थान मिळालय.

न्यूजीलंडची वनडे टीम- टॉम लॅथम (कॅप्टन), फिन एलेन (पहिली वनडे), टॉम ब्लंडेल, चेड बोवेस, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन (दूसरी, तीसरी वनडे), लॉकी फर्ग्युसन (पहिली वनडे), मॅट हेनरी, बेन लिस्टर (दूसरी, तीसरी वनडे), डॅरेल मिचेल, हेनरी निकल्स (दुसरी, तीसरी वनडे), ग्लेन फिलिप्स (पहिली वनडे), हेनरी शिप्ले, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर आणि विल यंग.