कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का !
अभिनेत्री कंगना रणौतची शेतकरी आंदोलनाबद्दलची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुचं आहे. Kangana Ranaut all cricketers
नवी दिल्ली: अभिनेत्री कंगना रणौतची शेतकरी आंदोलनाबद्दलची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुचं आहे. कंगना रणौतच्या निशाण्यावर सध्या क्रिकेटर्स आले आहेत. कंगनानं क्रिकेटपटू रोहित शर्माच्या ट्विटरवरुन क्रिकेट खेळाडूंवर निशाणा साधला आहे. “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?”, अशी टीका केलीय. शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करत आहेत?, असा सवाल कंगना रणौतनं विचारला आहे. (Kangana Ranaut slams all cricketers sounding like dhobi ka kutta na ghar ka na ghat ka)
शेतकरी दहशतवादी असल्याचा कंगनाचा पुनरुच्चार
कंगना रणौतनं “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी तिन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल.”ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेटर्सना दिलं आहे.
रोहित शर्माचं ट्विट
भारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा यानं केलं होते.
India has always been stronger when we all stand together and finding a solution is the need of the hour. Our farmers play an important role in our nation’s well being and I am sure everyone will play their roles to find a solution TOGETHER. #IndiaTogether ??
— Rohit Sharma (@ImRo45) February 3, 2021
कंगनाने रिहानाला फटकारले
अभिनेत्री कंगना रणौतने रिहानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’, असं कंगनाने म्हटलं आहे.
सचिन तेंडुलकरचं रिहानाला उत्तर
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.
संबंधित बातम्या:
जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !
Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर
(Kangana Ranaut slams all cricketers sounding like dhobi ka kutta na ghar ka na ghat ka)