KBC 15 : क्रिकेटर पतौडी यांच्याबाबत प्रश्न विचारताच सारा अली खान आणि शर्मिला टागोर यांच्यात तू तू मैं मैं, काय झालं वाचा

कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर सारा अली खान आणि शर्मिला टागोर या आजी नातीच्या जोडीने हजेरी लावली. यावेळी अनेक आठवणींना उजाळा मिळाला. एका पेक्षा एक सरस प्रश्न विचारले गेले. पण मन्सूर अली पतौडी यांच्याबाबत प्रश्न विचारताच आजी आणि नातीमध्ये तू तू मैं मैं पाहायला मिळाली.

KBC 15 : क्रिकेटर पतौडी यांच्याबाबत प्रश्न विचारताच सारा अली खान आणि शर्मिला टागोर यांच्यात तू तू मैं मैं, काय झालं वाचा
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 7:08 PM

मुंबई : कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं 15 वं पर्व नुकतंच पार पडलं. या कार्यक्रमाने सर्वसामन्यांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केलं आहे. कोट्यधीश होण्याच्या आशेने अनेकांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. काहीचं स्वप्न पूर्ण झालं तर काहींचं स्वप्न अधुरंच राहिलं. केबीसी 15 या पर्वाचा शेवट 29 डिसेंबर 2023 रोजी झाला. या पर्वाच्या शेवटच्या शोमध्ये सारा अली खान आणि शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. या दोघांनी मिळून 12 लाख 50 हजार रुपये कमावले आणि पुण्यकर्मासाठी दान केले. केबीसी 15 चा शेवटचा प्रश्न सारा अली खानचे आजोबा आणि शर्मिला टागोर यांचे पती मन्सूर अली खान पतौडी यांच्याबाबत होता. अमिताभ बच्चन यांनी शर्मिला टागोर आणि सारा अली खान यांना 12 वा प्रश्न  12.50 लाख रुपयांसाठी विचारला होता. जेव्हा अमिताभ बच्चन हा प्रश्न वाचत होते आणि ऑप्शन येण्यापूर्वीच शर्मिला टागोर यांनी  उत्तर दिलं. यावेळी सारा अली खान आणि शर्मिला टागोर यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं.

‘कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार होण्याचा मन्सूर अली खान पतौडीचा विक्रम कोणत्या संघाच्या खेळाडूने मोडला?’ अमिताभ बच्चन हा प्रश्न वाचत होते. त्यांनी याबाबतचे पर्यायही सांगितले नव्हते. त्यापूर्वीच शर्मिला टागोर यांनी दक्षिण अफ्रिका योग्य उत्तर असल्याचं सांगितलं. पण जेव्हा समोर पर्याय आले तेव्हा त्याच दक्षिण अफ्रिकेचं नावंच नव्हतं. ए वेस्ट इंडिज, बी ऑस्ट्रेलिया, सी इंग्लंड आणि डी झिम्बाब्वे असे पर्याय होते. तेव्हा साराने आजीला विचारलं की, तुझ्या उत्तरावर तू ठाम आहेस का? “पहिल्यांदा तू सांगत होती की दक्षिण अफ्रिका आणि असं तू वारंवार सांगितलं. आता येथे ऑप्शन नाही. तेव्हा तू झिम्बाब्वेचं नाव घेत आहे. तूला नक्की माहिती आहे ना.”

साराने आजीला वारंवार तू ठाम आहेस का विचारलं? तेव्हा शर्मिला टागोरने झिम्बाब्वे योग्य उत्तर असल्याचं सांगितलं. साराने वारंवार सांगूनही शर्मिला टागोर यांनी उत्तर बदललं नाही. त्यांच्याकडे दोन लाईफ लाईन उरल्या होत्या. सारा आणखी काही विचारण्याआधीच शर्मिला टागोर यांनी डी हे उत्तर लॉक केलं. त्यामुळे सारा आश्चर्यचकीत झालं. दोन लाईफलाईन असूनही रिस्क घेतल्याने तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.

अमिताभ बच्चन यांनी उत्तर लॉक करत बरोबर काय ते सांगितलं? तेव्हा सारा अली खानचा चेहरा चमकला. कारण शर्मिला टागोरने दिलेलं उत्तर बरोबर होतं. साराने आनंदाच्या भरात टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी उत्तराचं विश्लेषण करताना सांगितलं की, “जिम्बाब्वेचा टटेंडा टायबू 2004 साली कर्णधार झाला. तेव्हा त्याचं वय 20 वर्षे 358 दिवस होतं. तर मन्सूर अली खान कर्णधार झाले तेव्हा त्यांचं वय 21 वर्षे आणि 77 दिवस होतं.”

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.