आयपीएलपूर्वी बाप गेला, भर स्पर्धेत फॉर्म नव्हता, वादळ उठलं, पोलार्डने अर्धशतक ठोकलं, भर मैदानात हात जोडून बापाला वंदन!

Kieron Pollard : या मॅचचा हिरो अर्थातच कायर पोलार्ड ठरला. पोलार्डने अशक्य वाटणारी धावसंख्या आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर शक्य करुन दाखवली.

आयपीएलपूर्वी बाप गेला, भर स्पर्धेत फॉर्म नव्हता, वादळ उठलं, पोलार्डने अर्धशतक ठोकलं, भर मैदानात हात जोडून बापाला वंदन!
Kieron Pollard
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 9:27 AM

नवी दिल्ली : कायरन पोलार्डच्या झंझावाती खेळीच्या जोरावर, मुंबई इंडियन्सने (MI) धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) 4 विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. या मॅचचा हिरो अर्थातच कायर पोलार्ड ठरला. पोलार्डने अशक्य वाटणारी धावसंख्या आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर शक्य करुन दाखवली. पोलार्डने 34 चेंडूत नाबाद 87 धावा ठोकत, चेन्नईचं 219 धावांचे तगडे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केलं. पोलार्डने 6 फोर आणि 8 सिक्स ठोकले. (Kieron Pollard dedicates match winning knock to his father, who demised just before the IPL Mumbai indians beat chennai super kings mivscsk )

मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक विजयी धावांचे यशस्वीपणे पाठलाग केला आहे. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने शेवटच्या चेंडूवर पू्र्ण केले. चेन्नईला पराभूत करत मुंबईने या मोसमातला चौथा विजय साकारला. मुंबई पॉंइट्स टेबलमध्ये 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.

पोलार्डचा झंझावात

मुंबई-चेन्नईच्या मॅचमध्ये फक्त आणि फक्त पोलार्डचीच चर्चा होती. पोलार्डने सुरुवातीपासूनच तुफान उधळलं. चेन्नईच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. कायरन पोलार्डने चौकार ठोकत मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक लगावलं. पोलार्डने केवळ 17 चेंडूत 3 फोर आणि 6 सिक्ससह अर्धशतक लगावलं. अर्धशतकानंतर पोलार्डने बॅट, हेल्मेट काढून जमिनीवर ठेवले आणि हात जोडून आकाशाकडे पाहून डोळे घट्ट मिटून उभा राहिला.

वडिलांना वंदन

पोलार्डने आपलं हे अर्धशतक आपल्या पित्याला अर्पण केलं. काही आठवड्यांपूर्वीच पोलार्डचे वडील त्याला सोडून गेले. तुफानी खेळाडू पोलार्ड काही दिवसांपासून काहीसा हताश होता. यंदाच्या आयपीएलमध्ये पोलार्डला म्हणावा तसा फॉर्म सापडला नव्हता. मात्र चेन्नईसारख्या खतरनाक टीमविरुद्ध पोलार्डचा हात बसला आणि त्याने एक एक चेंडू थेट ढगात पाठवला. अर्धशतकानंतर पोलार्डने त्याच ढगाकडे पाहून हात जोडले आणि काही दिवसापूर्वी सोडून गेलेल्या आपल्या पित्याला भर मैदानातून वंदन केलं.

पोलार्डच्या वडिलांचं निधन

दरम्यान, आयपीएलच्या काही आठवड्यांपूर्वीच पोलार्डच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी पोलार्डने 24 मार्च रोजी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. “शांतपणे आणि सन्मानाने स्थिरावा. नेहमीच प्रेम राहील. अनेकांची मनं जिंकली. तुम्हाला नेहमीच माझा अभिमान वाटेल. आता उंच मुलगा नाही. मला माहित आहे की आपण एका चांगल्या ठिकाणी आहात” असं पोलार्ड म्हणाला होता.

पोलार्डने आयपीएल ट्रॉफी घेतलेला वडिलांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. बाप-लेक दोघेही त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या जर्शीमध्ये दिसले होते.

पोलार्डची इन्स्टा पोस्ट

पोलार्डचं वेगवान अर्धशतक

पोलार्डने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. या दरम्यान पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतक लगावलं. यासह पोलार्ड या 14 व्या मोसमात दिल्लीच्या पृथ्वी शॉला पछाडत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

गगनचुंबी षटकार

पोलार्डने आपल्या खेळीत एकूण 8 सिक्स लगावले. त्यापैकी 3 सिक्स हे 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने 93, 97 आणि 105 मीटर लांबीचे गगनचुंबी सिक्स लगावले.

संबंधित बातम्या 

IPL 2021, MI vs CSK | वादळी खेळीसह पोलार्डचा विक्रम, मुंबईची ऐतिहासिक कामगिरी    

MI vs CSK IPL 2021 Match 27 | कायरन पोलार्डची झंझावाती खेळी, रंगतदार सामन्यात मुंबईचा चेन्नईवर 4 विकेट्सने धमाकेदार विजय

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.