दुपारची वेळ… 2 वाजून 21 मिनिटाने काय झालं?; क्रिकेटशी काय संबंध?
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघातील अनेक खेळाडूंनी शरीरावर केलेल्या टॅटूंमुळे एक नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. रिंकू सिंहच्या 'गॉड्स प्लॅन' आणि 'फॅमिली' टॅटूंमधून त्याच्या आयुष्यातील प्रवास दिसून येतो. वैभव अरोराचा टॅटू ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू अमांडा वेलिंग्टनसारखाच आहे. क्रिकेटमध्ये टॅटूचा ट्रेंड वाढत असून, केकेआरच्या खेळाडूंचे टॅटू हे आणखी प्रेरणा देतील का हे पाहणे महत्वाचे आहे.

कोलकाता नाइट राइडर्स (KKR) मध्ये टॅटूचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. संघाचे अनेक खेळाडू त्यांच्या शरीरावर बनवलेल्या टॅटूद्वारे त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवर भाष्य करत आहेत. KKR चे फलंदाज रिंकू सिंहचे टॅटू खूप खास आहेत. संघाचा यूट्यूब शो ‘Knight Bite’ मध्ये शेफ कुणाल खन्नासोबत बोलताना रिंकूने आपल्या टॅटूंबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
रिंकूच्या डाव्या हातावर ‘God’s plan’ आणि उजव्या हातावर ‘Family’ असा टॅटू आहे. या टॅटूतून त्याच्या आयुष्यातील त्याचा आजवरचा प्रवास दिसून येतो. 2018 मध्ये जेव्हा KKR ने मला 80 लाखात घेतले, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, घर नव्हते, आणि कोणतीही सोय नव्हती. पण त्यानंतर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात सुलभता आली, म्हणूनच मी ‘Family’ हा टॅटू बनवला आहे, असं रिंकू सिंहने सांगितलं.
वेळ बदलली
तसेच, रिंकूच्या हातावर एक घड्याळाचा टॅटू आहे, त्यातील वेळ दुपारचे 2:21 मिनिटे दाखवलेली आहे. रिंकूने याला आपल्या यशाचं प्रतीक म्हटले आहे. KKR ने त्याला तिथेच निवडले आणि त्याची वेळ बदलली, असं त्याचं म्हणणं आहे. याशिवाय, त्याच्या शरीरावर ‘Peace’ आणि ‘Udaan’ अशा टॅटूंचा देखील समावेश आहे, ते जीवनात शांती आणि प्रगतीचा संदेश देतात.
वाचा: मामीला पाहून भाच्याची नजर फिरली, इच्छाही पूर्ण झाली.. पण तेवढ्यात मामा कळालं अन्..
वैभव अरोड़ा आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटरचा सेम टॅटू
KKR चा वेगवान गोलंदाज वैभव अरोड़ा यांच्या हातावर एक खास टॅटू आहे. ऑस्ट्रेलियाच्या लेग स्पिनर अमांडा वेलिंग्टनच्या टॅटूसारखाच वैभवचा टॅटू आहे. “You are your own limit. Remember what you started”, असं वैभवच्या हातावर लिहिलं आहे. अमांडा वेलिंग्टनचा टॅटूही असाच आहे.
टॅटूचा वाढता ट्रेंड
भारतीय क्रिकेटमध्ये टॅटूचा ट्रेंड खूप वाढला आहे. विराट कोहलीचा सामुराई, सूर्यकुमार यादवचे 18 टॅटू, हार्दिक पंड्याचा सिंह आणि केएल राहुलचा कुत्रा… या टॅटूंची सध्या खूप चर्चा आहे. याआधी क्रिस गेल आणि बेन स्टोक्स यांच्या टॅटूंमुळे सोशल मीडियावर ‘टॅटू वॉर’ देखील झाला होता. आता पाहूया की KKR चे खेळाडूंचे हे टॅटू आणखी खेळाडूंना प्रेरित करतात की नाही.