KKR vs SRH | नितीश राणा याची वादळी खेळी, हैदराबाद विरुद्ध दे दणादण फटकेबाजी
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा याने सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध मोठा कारनामा केला आहे. नितीशने यासह मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
कोलकाता | कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा याने आयपीएल 16 व्या मोसमात 19 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शानदार खेळी करत अफलातून कामगिरी केली आहे. नितीश राणा याने कोलकाता विरुद्ध एकूण 75 धावांची तुफानी खेळी केली. नितीशने या खेळीदरम्यान मोठा कारनामा केला. नितीशने यासह मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं. नितीश राणा याने कोलकाताच्या डावातील सहाव्या ओव्हरमध्ये 28 धावा ठोकल्या. या दरम्यान नितीश याने चौकार ठोकत आयपीएलमधील 200 चौकार पूर्ण केले.
नितीश राणा याचा तडाखा
जम्मू एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हैदराबादचा गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील सहावी ओव्हर टाकायला आला. नितीश राणा मोठे शॉट मारण्याची संधीच शोधत होता. उमरान मलिकच्या बॉलिंगवर नितीशने पहिल्याच बॉलपासून दे दणादण फटके मारायला सुरुवात केली. नितीशने या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि सहाव्या बॉलवर सिक्स ठोकला. तर बाकी बॉलवर चौकार ठोकले. विशेष म्हणजे नितीशने या खेळीदरम्यान आयपीएलमधील 200 चौकार पूर्ण करत अनोखं द्विशतकही पूर्ण केलं.
नितीशने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली होती. राणा मिळेल तिथे फटके मारत होता. या दरम्यान राणा याने अवघ्या 25 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. राणा अर्धशतक अर्धशतक ठोकल्यानंतर आणखी आक्रमक झाला. राणा हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढत होता. राणाने मैदानातील एक कोपरा असा ठेवला नाही, जिथे त्याने फटका मारला नसेल.
राणाने आक्रमण सुरुच ठेवलं होतं. मात्र राणाच्या या वादळी खेळीला टी नटराजन याने ब्रेक लावला. नटराजन याने राणाला वॉशिंग्टन सुंदर याच्या हाती कॅच आऊट केलं. राणाने 41 बॉलमध्ये 182.93 च्या स्ट्राईक रेटने 6 खणखणीत गगनचुंबी सिक्स आणि 5 रंपाट चौकारांच्या मदतीने 75 धावांची शानदार खेळी केली. राणाने या खेळीच्या मदतीने टी 20 क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पाही पार केला.
कोलकाता नाइट राइडर्स | नीतीश राणा (कर्णधार), राहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, एन जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्यूसन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
सनराइजर्स हैदराबाद | एडेन मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासन, अभिषेक शर्मा, मार्को जानेसन, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक.