KKR vs CSK IPL 2023 Highlights | केकेआरची हार, चेन्नई सुपर किंग्सचा 49 धावांनी विजय

| Updated on: Apr 24, 2023 | 12:05 AM

KKR vs CSK IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये आज 23 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात सीएसकेने केकेआरवर 49 धावांनी विजय मिळवला.

KKR vs CSK IPL 2023 Highlights | केकेआरची हार, चेन्नई सुपर किंग्सचा 49 धावांनी विजय

कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 23 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होत. या डबल हेडलमधील पहिला आणि मोसमातील 32 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध  राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने 7 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं होतं. चेन्नईने या सामन्यात केकेआरवर 49 धावांनी विजय मिळवला.  चेन्नईने केकेआरला विजयासाठी 236 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र  केकेआरला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 186 धावाच करता आल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 23 Apr 2023 11:28 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईचा मोठा विजय

    चेन्नईने सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने केकेआरला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र केकेआरला 20 ओव्हरमध्ये  8 विकेट्स गमावून 186 धावाच करता आल्या.  चेन्नईचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला.

  • 23 Apr 2023 11:17 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरला आठवा झटका

    कोलकाताने आठवी विकेट गमावलीय. उमेश यादव 4 धावांवर आऊट झाला.

  • 23 Apr 2023 11:12 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरला सातवा झटका

    कोलकाता नाईट रायडर्सने सातवी विकेट गमावली आहे. डेव्हिड विसे आऊट झाला आहे.

  • 23 Apr 2023 10:51 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | जेसन रॉय अर्धशतकानंतर आऊट

    जेसन रॉय अर्धशतक ठोकल्यानंतर आऊट झालाय. जेसनने 26 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या.

  • 23 Apr 2023 10:44 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | जेसन रॉय याचं अर्धशतक

    जेसन रॉय याने चेन्नई विरुद्ध अर्धशतक ठोकलंय. जेसनने अवघ्या 19 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली. तसेच रिंकू सिंह आणि जेसन रॉय या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केलीय.

  • 23 Apr 2023 10:19 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरला चौथा धक्का

    कोलकाताने चौथी विकेट गमावली आहे. कॅप्टन नितीश राणा याने 27 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 23 Apr 2023 10:13 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरला तिसरा झटका

    कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा झटका लागला आहे. वेंकटेश अय्यर 20 धावा करुन माघारी परतला.

  • 23 Apr 2023 09:42 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरला दुसरा धक्का

    केकेआरने दुसरी विकेट गमावली आहे. सुनील नारायण याच्यानंतर एन जगदीशन आऊट झाला आहे.

  • 23 Apr 2023 09:38 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | सुनील नारायण शून्यावर बाद, केकेआरला पहिला धक्का

    कोलकाता नाईट रायडर्सची निराशाजनक सुरुवात झाली आहे. केकेआरने 236 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये सुनील नारायण याची विकेट गमावली आहे. नारायण झिरोवर आऊट झाला आहे.

  • 23 Apr 2023 09:32 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात

    केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईने केकेआरला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 23 Apr 2023 09:22 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरला विजयासाठी 236 रन्सचं टार्गेट

    डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या तिकडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 236 रन्सचं टार्गेट दिलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 235 धावा केल्या.

  • 23 Apr 2023 09:15 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईला चौथा धक्का

    चेन्नईने चौथी विकेट गमावली आहे. रविंद्र जडेजा याने 18 धावा केल्या. धोनी बाद झाल्यानंतर सीएसके कॅप्टन महेंद्रसिंह धोनी मैदानात आला आहे.

  • 23 Apr 2023 09:03 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | वेगवान अर्धशतकानंतर शिवम दुबे आऊट

    चेन्नई सुपर किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. वेगवान अर्धशतक ठोकल्यानंतर शिवम दुबे आऊट झालाय. दुबेने 21 बॉलमध्ये 5 गगनचुंबी सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. रहाणे आणि दुबे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली.

  • 23 Apr 2023 09:00 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | अजिंक्य रहाणे याचं अफलातून अर्धशतक

    अजिंक्य रहाणे याने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलंय. रहाणेने अवघ्या 24 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं.

  • 23 Apr 2023 08:43 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या दोघांनी  तिसऱ्या विकेट्ससाठी अवघ्या 16 चेंडूत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. चेन्नईसाठी ही सर्वात वेगवान अर्धशतकी भागीदारी ठरली आहे.  याआधी महेंद्रसिंह धोनी आणि एस बद्रीनाथ या दोघांनी वेगवान अर्धशतकी भागीदारी केली होती.

  • 23 Apr 2023 08:29 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईला दुसरा झटका, डेव्हॉन कॉनवे आऊट

    चेन्नई सुपर किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. डेव्हॉन कॉनवे आऊट झाला आहे. कॉनवे याने 40 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली.  कॉनवेचं हे या मोसमातील सलग चौथं अर्धशतक ठरलं.

  • 23 Apr 2023 08:17 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | डेव्हॉन कॉनवे याचं सलग चौथं अर्धशतक

    चेन्नईा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने या मोसमात सलग चौथं अर्धशतक ठोकलंय. कॉनवेच्या या अर्धशतकामुळे चेन्नई चांगल्या स्थितीत पोहचली आहे.

  • 23 Apr 2023 08:06 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईला पहिला झटका

    केकेआरने चेन्नईची सेट झालेली सलामी जोडी फोडली आहे.  सुयश शर्मा याने ऋतुराज गायकवाड याला बोल्ड करत केकेआरला ब्रेक थ्रू मिळवून दिला.

  • 23 Apr 2023 07:53 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नईची शानदार सुुरुवात

    चेन्नई सुपर किंग्सची शानदार सुरुवात झाली आहे. सीएसकेच्या डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये नाबाद 45 धावा जोडल्या आहेत.

  • 23 Apr 2023 07:30 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नई बॅटिंगसाठी मैदानात, सामन्याला सुरुवात

    चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामी जोडी मैदानात आली आहे.  केकेआरने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

  • 23 Apr 2023 07:15 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | चेन्नई प्लेइंग इलेव्हन

    चेन्नई प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना

  • 23 Apr 2023 07:13 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआर प्लेइंग इलेव्हन

    केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

  • 23 Apr 2023 07:03 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआरने टॉस जिंकला

    कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन नितीश राणा याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 23 Apr 2023 06:59 PM (IST)

    KKR vs CSK IPL 2023 Live Score | केकेआर विरुद्ध सीएसके आमनेसामने

    आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 33 वा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे.

Published On - Apr 23,2023 6:58 PM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.