पश्चिम बंगाल | रिंकू सिंह हा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स टीमसाठी मॅचविनर ठरला आहे. केकेआरला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. रिंकूने या शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकू अशा प्रकारे पुन्हा एकदा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. पंजाब किंग्स टीमने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्या पूर्ण केलं. रिंकूने 10 बॉलमध्ये नॉट आऊट 21 पण विजयी धावा केल्या.
केकेआरकडून कॅप्टन नितीश राणा याने सर्वाधिक 51 धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला. जेसन रॉय याने 38 धावा केल्या. रहमनुल्लाह गुरुबाज याने 15 रन्स केल्या. वेंकटेश अय्यर 11 धावांवर बाद झाला. तर आंद्रे रसेल हा शेवटच्या ओव्हरमध्ये निर्णायक क्षणी 42 धावांवर रनआऊट झाला. खरंतर रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल या जोडीनेच निर्णायक क्षणी जोरदार बॅट फिरवत फटकेबाजी करत केकेआरला विजयापर्यंत पोहचवलं. पंजाब किंग्सकडून राहुल चहर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
रिंकूचा मॅचविनिंग चौकार
"Rinku Singh" Outstanding Finishing Wow ?#KKRvsPBKS pic.twitter.com/HCk3t5mJh0
— Nazaket Rather (@RatherNazaket) May 8, 2023
दरम्यान त्याआधी पंजाब किंग्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. पंजाबकडून कॅप्टन शिखर धवन याने 47 बॉलमध्ये सर्वाधिक 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीन 57 धावांची कॅपन्टन्सी खेळी केली. प्रभासिमरन सिंह याने 12 रन्स जोडल्या. भानुका राजपक्षा झिरोवर आऊट झाला. लियाम लिविंगस्टोन याला वरुण चक्रवर्थी याने 15 धावांवर आऊट केला. जितेश शर्मा याने 21 रन्स जोडल्या. सॅम करनला फक्त 4 धावाच करता आल्या.
ऋषी धवन 19 रन्स करुन तलवार म्यान केली. तर शाहरुख खान आणि हरप्रीत ब्ररार या दोघांनी निर्णायक क्षणी टॉप गिअर टाकत जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 40 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. शाहरुख खान याने 8 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नॉट आऊट 21 धावांची निर्णायक खेळी केली. तर हरप्रीत ब्रार याने 9 बॉलमध्ये 1 सिक्स 2 फोरसह नाबाद 17 धावा केल्या.
केकेआरकडून वरुण चक्रवर्थी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षीत राणा याने 2 फलंदाजांना चालता केला. तर सुयश शर्मा आणि कॅप्टन नितीश राणा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्स प्लेंइग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभासिमरन सिंग, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, रिशी धवन राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वैभव अरोरा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.