KKR vs RCB IPL 2023 Highlights | कोलकाताचा आरसीबीवर 81 धावांनी मोठा विजय
KKR vs RCB IPL 2023 Live Score Updates | आयपीएल 16 व्या हंगामातील नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.
कोलकाता | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती फलंदाजीनंतर वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 मधील पहिला विजय मिळवला. कोलकाताने पहिले बॅटिंग करताना 7 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी 17.4 षटकांत 123 धावांवर ऑलआऊट झाली. केकेआरचा हा या मोसमातील पहिला विजय तर आरसीबीचा पहिला पराभव ठरला. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं होतं.
LIVE Cricket Score & Updates
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबी फिरकीच्या जाळ्यात, केकेआरचा दमदार विजय
कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने आरसीबीला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र कोलोकाताच्या फिरकी गोलंदाजांनी आरसीबीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. आरसीबी 17.4 ओव्हरमध्ये 123 धावांवर ऑलआऊट झाली. कोलकाताचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | वरुण चक्रवर्ती याचा दणका, आरसीबीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
वरुण चक्रवर्तीने आरसीबीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. विराट आणि फॅफ सलामी जोडी माघारी परतली. त्यानंतर वरुणने सामन्यातील आठव्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि त्यानंतर हर्षल पटेल या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
-
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीला दुसरा धक्का
विराट कोहली याच्यानंतर आरसीबीने दुसरी विकेटही गमावली आहे. विराटनंतर कॅप्टन फॅफ डु प्लेसिस आऊट झाला आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याने फॅफला बोल्ड केलं. फॅफने 23 धावा केल्या. अशा प्रकारे आरसीबीची सलामी जोडी माघारी परतली आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीची पहिली विकेट
आश्वासक सुरुवातीनंतर आरसीबीला पहिला झटका लागला आहे. सुनील नरीन याने केकेआरला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. सुनीलने विराटला 21 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीची शानदार सुरुवात, विराट-फाफ मैदानात
आरसीबीने 205 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली आहे. आरसीबीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये बिनबाद 19 धावा केल्य आहेत. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसी आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
-
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीला विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट
शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह या जोडीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाताने बंगळुरुला विजयासाठी 205 धावांचं आव्हा दिलं आहे. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. ओपनर रहमनुल्लाह गुरुबाज याने 57 रन्सची खेळी केली. तर रिंकू सिंह याने 46 रन्सचं योगदान दिलं. तर आरसीबीकडून कर्ण शर्मा आणि डेव्हिज विली या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि ब्रेसवल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | शार्दुल ठाकूर याचं वादळी अर्धशतक
शार्दुल ठाकूर याने आरसीबी विरुद्ध अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. शार्दुलच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पहिलंवहिवं अर्धशतक ठरलं. शार्दुलने चौकार ठोकत हे अर्धशतक पूर्ण केलं. तसेच शार्दुलने आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम हा संयुक्तपणे जॉस बटलर आणि शॉर्दुल ठाकूर या दोघांच्या नावावर झाला आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | कर्ण शर्माचा धडाका, धोकादायक आंद्रे रसेल पहिल्याच बॉलवर आऊट
डेव्हिड विलीनंतर आरसीबीचा फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा यानेही सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत. कर्णने आधी रहमनुल्लाह गुरुबाज आणि त्यानंतर आंद्रे रसेल या धोकादायक फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | कॅप्टन नितीश राणा आऊट
कोलकाताने कॅप्टन नितीश राणाच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे. यामुळे कोलकाताची 47-3 अशी स्थिती झाली आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | केकेआरला बॅक टु बॅक 2 धक्के
कोलकाताने सलग 2 विकेट गमावले आहेत. वेंकटेश अय्यर आधी 3 धावा करुन आऊट झाला. वेकंटेशच्या रुपात केकेआरला पहिला झटका लागला. त्यानंतर मनदीप सिंह देखील पहिल्याच बॉलवर बोल्ड झाला. डेव्हिड विलीने या 2 विकेट्स घेतल्या. या 2 विकेट्स घेत आरसीबीने शानदार सुरुवात केली आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात
कोलकाता नाईट रायडर्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रहमानुल्लाह गुरबाज आणि वेंकटेश अय्यर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. आरसीबीने रीस टोपली याच्या जागी डेव्हिड विली याला संधी दिली आहे. तर केकेआरने अनूकुल सिंग याच्या जागी सुयश शर्मा याचा समावेश केला आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबी प्लेइंग इलेव्हन
फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन
नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | आरसीबीने टॉस जिंकला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला आहे. कॅप्टन फॅफ डु प्लेसीसने नाणेफेक जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल करण्यात आला आहे.
-
KKR vs RCB IPL 2023 Live Score | केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात कडवी झुंज
आयपीएल 16 व्या मोसमात आज 6 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आमनासामना होणार आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यात केकेआरचा युवा कर्णधार नितीश राणा याच्यासमोर अनुभवी फॅफ डु प्लेसीस याचं आव्हान आहे. त्यामुळे नितीश कशाप्रकारे आरसीबीचा सामना करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
केकेआर विरुद्ध आरसीबी
Welcome to the live coverage of Match 9 in TATA IPL 2023 between Kolkata Knight Riders and Royal Challengers Bangalore. https://t.co/J6wVwbsfV2 #TATAIPL #KKRvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
Published On - Apr 06,2023 6:46 PM