KKR Vs SRH Head to Head Records: केकेआर की हैदराबाद;दोघांपैकी वरचढ कोण? आकडे काय सांगतात?
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Head to Head : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये ट्रॉफीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध आतापर्यंत कामिगरी कशी राहिली आहे? जाणून घ्या.
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 17 व्या हंगामातील अंतिम सामना हा रविवारी 26 मे रोजी होणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाज आमनेसामने असणार आहेत. हा सामना चेन्नईतील चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. केकेआरने क्वालिफायर 1 सामन्यात हैदराबादवर मात करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. तर हैदराबादने राजस्थानचा क्वालिफायर 2 मध्ये धुव्वा उडवत अंति सामन्याचं तिकीट मिळवलं. आता केकेआर विरुद्ध एसआरच यांच्यात ट्रॉफीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघांची एकमेकांसमोर आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
केकेआर विरुद्ध एसआरच हेड टु हेड रेकॉर्ड्स
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 पैकी सर्वाधिक सामन्यात केकेआरचा बोलबाला राहिला आहे. अर्थात केकेआर हैदराबादवर वरचढ राहिली आहे. कोलकाताने एकूण 18 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादला 9 सामन्यात केकेआरवर मात करता आला आहे. तर केकेआरने गेल्या 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एसआरचने 2 सामने खेळले आहेत.
दरम्यान केकेआरने याआधी हैदराबादवर या हंगामात एकूण 2 वेळा विजय मिळवला आहे. केकेआरने आधी साखळी फेरीत 4 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर क्वालिफायर 1 सामन्यात केकेआरने हैदराबादचा धुव्वा उडवला. त्यामुळे केकेआरची हैदराबाद विरुद्धची आकडेवारी ही सर्वच बाबतीत सरस आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत केकेआर कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.