KKR vs SRH IPL 2023 Highlight : सनराईजर्स हैदराबादचा कोलकात्यावर 23 धावांनी विजय

| Updated on: Apr 14, 2023 | 11:32 PM

KKR vs SRH IPL 2023 Highlight : आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचं पाणी पाजलं. नितीश राणा आणि रिंकु सिंहची आक्रमक खेळी वाया गेली.

KKR vs SRH IPL 2023 Highlight : सनराईजर्स हैदराबादचा कोलकात्यावर 23 धावांनी विजय
KKR vs SRH 2023 Live Update : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद, कोण मारणार बाजी?

मुंबई :  आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट नाईडर्स विरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला. हैदराबादनं विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कोलकाता संघाला 20 षटकात 7 गडी गमवून 205 धावा करता आल्या. त्यामुळे सलग तीन विजय मिळवण्याचं कोलकात्याचं स्वप्न भंगलं. तर सनराईजर्स हैदराबादनं सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत कमबॅक केलं आहे. या विजयासह हैदराबादनं स्पर्धेत चांगलं कमबॅक केलं आहे.

कोलकात्याचा डाव

हैदराबादनं विजयासाठी दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करण्यासाठी रेहमनुल्ला गुरबाज आणि नारायण जगदीसन ही जोडी मैदानात उतरली. पण तिसऱ्या चेंडूवर खातंही न खोलता गुरबाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला वेंकटेश अय्यरही काही खास करू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर अवघ्या 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला सुनिल नरीनही शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर दबाव वाढला

कर्णधार नितीश राणा मैदानात आला आणि जगदीसनसोबत चांगली भागीदारी केली. आक्रमक खेळी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ही जोडी फोडण्यात मयंक मार्केंडयला यश आलं. जगदीसन 36 धावांवर असताना त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

आंद्रे रसेल संघावरील दबाव दूर करण्यासाठी उत्तुंग फटका मारला. पण चेंडू खूप वर चढल्यानं मार्को जानसेननं कसलीही चूक न करता त्याचा झेल घेतला. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकु सिंह जोडीने कमाल केली. सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान नितीशला झेल सोडल्याने जीवदान मिळालं. आक्रमक खेळी करताना टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 41 चेंडूत 75 धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकून 7 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 14 Apr 2023 11:17 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादनं कोलकात्याला 23 धावांनी नमवलं

    मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट नाईडर्स विरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला. हैदराबादनं विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कोलकाता संघाला 20 षटकात 7 गडी गमवून 205 धावा करता आल्या. त्यामुळे सलग तीन विजय मिळवण्याचं कोलकात्याचं स्वप्न भंगलं. तर सनराईजर्स हैदराबादनं सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत कमबॅक केलं आहे.

  • 14 Apr 2023 11:10 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | रिंकु सिंहची अर्धशतकी खेळी

  • 14 Apr 2023 11:01 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | नितीश राणाचं वादळ शमलं, 75 धावा करून बाद

  • 14 Apr 2023 10:50 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | नितीश राणा आणि रिंकू सिंह जोडीची अर्धशतकी भागीदारी

    नितीश राणाच्या 4 हजार धावा पूर्ण

  • 14 Apr 2023 10:35 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | नितीश राणाची जबरदस्त खेळी, 25 चेंडूत 50 धावा ठोकल्या

  • 14 Apr 2023 10:23 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | आंद्रे रसेल स्वस्तात बाद, तीन धावा करून तंबूत

  • 14 Apr 2023 10:11 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादचा चौथा गडी बाद, जगदीसन 36 धावांवर झेलबाद

  • 14 Apr 2023 09:48 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | वेंकटेश अय्यर पाठोपाठ सुनील नरेन तंबूत

  • 14 Apr 2023 09:45 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | कोलकात्याला दुसरा धक्का, वेंकटेश अय्यर 10 धावा करून बाद

  • 14 Apr 2023 09:39 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | कोलकात्याला पहिला धक्का, गुरबाज शून्यावर बाद

  • 14 Apr 2023 09:14 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादच्या 4 गडी बाद 228 धावा, ब्रूकची शतकी खेळी

    मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट नाईडर्ससमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकात्याने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. हैदराबादनं 20 षटकात 4 गडी गमवून 228 धावा केल्या. आता हे आव्हान कोलकाता कसं गाठतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    हैदराबादचा डाव

    हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी चांगली खेळी केली. तर हॅरी ब्रूकने आक्रमक खेळी केली. पण 9 धावांवर असताना मयंक अग्रवाल बाद झाला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीने त्याचा झेल घेतला.  त्यानंतर राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. दोन चौकार मारल्यानंतर आंद्रे रसेलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ब्रूक आणि मार्करमनं हैदराबादचा डाव सावरला.  मार्करमने आक्रमक फटकेबाजी करत 50 धावा ठोकल्या. पण उत्तुंग फटका मारताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

    अभिषेक शर्माने मैदानात येत आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने  17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. मात्र आंद्रे रसेलच्या गोलंदाजी झेलबाद झाला. त्यानंतर ब्रूक्सन मोर्चा सांभाळला आणि शतकी खेळी केली. त्याने 55 चेंडूत 100 धावा केल्या.

  • 14 Apr 2023 09:11 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | हैदराबादसाठी हॅरी ब्रूकची शतकी खेळी, पैसा केला वसूल

  • 14 Apr 2023 09:01 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | अभिषेक शर्मा 17 चेंडूत 32 धावा करून बाद

  • 14 Apr 2023 08:31 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | मार्करम 26 चेंडूत 50 धावा करून बाद

  • 14 Apr 2023 08:21 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | हॅरी ब्रूकची अर्धशतकी खेळी

  • 14 Apr 2023 07:58 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | आंद्रे रसेलच्या पहिल्याच षटकात दोन गडी बाद

    मयंक अग्रवालनंतर राहुल त्रिपाठीला बाद करण्यात आंद्रे रसेलला यश मिळालं. पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले.

  • 14 Apr 2023 07:52 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | आंद्रे रसेलला पहिल्या चेंडूवर यश, मयंक अग्रवालला केलं बाद

    आयपीएल 2023 मध्ये पहिलच षटक टाकणाऱ्या आंद्रे रसेलला पहिल्याच चेंडूवर यश मिळालं. मयंक अग्रवालला 9 धावांवर असताना बाद केलं.

  • 14 Apr 2023 07:47 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | हॅरी ब्रुकची आक्रमक खेळी, उमेश यादवला दोन षटकार

  • 14 Apr 2023 07:32 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकचा चौकार

    सनराईजर्स हैदराबादची चौकाराने सुरुवात, हॅरी ब्रूकने उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर मारला चौकार

  • 14 Apr 2023 07:08 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | सनराईजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन

  • 14 Apr 2023 07:06 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन

    कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

  • 14 Apr 2023 07:02 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजीची निर्णय

    कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • 14 Apr 2023 05:06 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | सनराईजर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

    हैदराबादचा पूर्ण स्क्वॉड : अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अकील होसैन, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, आदिल रशीद, मयंक मार्कण्डेय, विवरांत शर्मा, मयंक डागर, समर्थ व्यास, सनवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव आणि नीतीश कुमार रेड्डी.

  • 14 Apr 2023 05:06 PM (IST)

    KKR vs SRH IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ

    कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.

Published On - Apr 14,2023 5:05 PM

Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.