KKR vs SRH | कोलकाता-हैदराबाद सामन्याआधी स्टार ऑलराउंडर बाहेर
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदाबादने टीममध्ये स्टार ऑलराउंडर खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी आहे.
कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमातील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन नितीश राणा याने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरने गेल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा त्यांच्याच घरात विजय मिळवला होता. त्यामुळे केकेआरने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये 1 पण मोठा बदल केला आहे.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हनमध्ये अभिषेक शर्मा याला संधी देण्यात आली. शर्मा याच्यामुळे स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलं आहे.
जेसन रॉय यालाही संधी नाहीच
कोलकाताही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 1 बदल करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. गुरुबाज सिंह याच्या जागी जेसन रॉय याला खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र केकेआरचा कॅप्टन नितीश राणा याने टॉसदरम्यान टीममध्ये बदल केलं नसल्याचं सांगितलं.
अशी आहे खेळपट्टी
इडन गार्डनमध्ये चौकार-षटकारांची आतिशबाजी पाहायला मिळू शकते. समोरची बाऊंड्री ही 75 मीटर इतकी आहे. तर साईड बाऊंड्री 64-65 मीटर इतकी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठे फटके पाहायला मिळू शकतात.
हेड टु हेड आकडेवारी
दरम्यान आतापर्यंत आयपीएल इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्सं हैदराबाद एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये केकेआरचा वरचष्मा राहिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला 15 सामन्यात पराभूत केलं आहे. तर फक्त 8 सामन्यात हैदराबादने कोलकातावर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या 24 व्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता नाइट राइडर्स | नीतीश राणा (कर्णधार), राहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, एन जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्यूसन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
सनराइजर्स हैदराबाद | एडेन मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासन, अभिषेक शर्मा, मार्को जानेसन, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक.