KKR vs SRH IPL 2024 Final Live Streaming: केकेआर-हैदराबाद फायनलसाठी तयार, सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
Watch IPL 2024 Final Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. शुक्रवारी 24 मे रोजी सनरायजर्स हैदराबादने क्वालिफायर 2मध्ये राजस्थान रॉयल्सवर मात करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने 1 सामन्यात हैदराबादवर विजय मिळवत सर्वातआधी फायनलमध्ये प्रवेश केला. तर हैदराबादला दुसऱ्या संधीत फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी होता आलं. आता अंतिम सामन्यात क्वालिफायर 1 नंतर पुन्हा एकदा कोलकाता विरुद्ध हैदराबाद असा सामना होणार आहे. श्रेयस अय्यर याच्याकडे केकेआरच्या कॅप्टन्सीची जबाबदारी असणार आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादची धुरा सांभाळणार आहे. या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल केव्हा?
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅच रविवारी 26 मे रोजी होणार आहे.
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅच कुठे?
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅच चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम, येथे होणार आहे.
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल टीव्हीवर कुठे पाहता येणार?
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
केकेआर विरुद्ध एसआरच फायनल मॅच मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.