KKR vs SRH : कामिंदु मेंडिसची दोन्ही हाताने गोलंदाजी! सेट बॅट्समन अंगकृष रघुवंशीला असं अडकवलं Watch Video
आयपीएल 2025 स्पर्धेतील 15वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुसरीकडे, कोलकात्याने सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर सावध खेळी केली. अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशीने डाव सावरला.

आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकापासून हैदराबादच्या गोलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर ढकललं. क्विंटन डीकॉक आणि सुनील नरीन स्वस्तात बाद झाले. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ बॅकफूटवर आला होता. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी सावध खेळी केली. या जोडीने संघाला संकटातून बाहेर काढलं. अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी जोडीने 81 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात झिशान अन्सारीला यश आलं. अजिंक्य रहाणे 27 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकार मारत 38 धावा करून करून बाद झाला. दुसऱ्या बाजूने अंगकृष रघुवंशीने आक्रमक खेळी सुरुच ठेवली होती. अंगकृषने 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत 50 धावा केल्या. त्याला बाद करण्याचं मोठं आव्हान कर्णधार पॅट कमिन्सच्या पुढे होतं. त्यामुळे कामिंदु मेंडिसला गोलंदाजीला बाहेर काढलं. दोन्ही हाताने गोलंदाजी करण्यात मेंडिस माहीर आहे.
अंगकृष रघुवंशी स्ट्राईकला होता आणि 49 धावांवर खेळत होता. त्यामुळे कामिंदु मेंडिसने डाव्या हाताने ऑफब्रेक टाकण्याचा निर्णय घेतला. कामिंदुने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या चेंडूवर वेंकटेश अय्यर समोर आला. त्याच्यासाठी डाव्या हाताने चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला. कारण डावखुरा असल्याने त्याने अशा पद्धतीने गोलंदाजी केली. वेंकटेशने एक धाव घेतली आणि रघुवंशीला स्ट्राईक दिला. त्याला उजव्या हाताने तिसरा चेंडू टाकला आणि निर्धाव गेला. पण चौथ्या चेंडूवर अंगकृष चुकला आणि हर्षल पटेल अप्रतिम झेल पकडला.
Left 👉 Right Right 👉 Left Confused? 🤔
That’s what Kamindu Mendis causes in the minds of batters 😉
Updates ▶ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH | @SunRisers pic.twitter.com/IJH0N1c3kT
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंग्रस रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.