KKR vs SRH Score, IPL 2024: केकेआरचा हैदराबाद विरुद्ध धमाकेदार विजय, फायनलमध्ये एन्ट्री
KKR vs SRH Score, IPL 2024 Qualifier 1 Match Highlights in Marathi: कोलकाता नाईट रायडर्सची ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची ही चौथी वेळ ठरली आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे करण्यात आलं होतं. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत पहिल्यांदा तर एकूण चौथ्यांदा केकेआर फायनलमध्ये पोहचलीय. केकेआरने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला 159 धावांवर गुंडाळल्याने विजयासाठी 160 धावांची आव्हान मिळालं. केकेआरने हे आव्हान 2 विके्टस गमावून पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादला पराभवानंतरही फायनलमध्ये पोहचण्यासाठी संधी मिळणार आहे. एलिमिनेटरमध्ये विजयी होणाऱ्या संघाविरुद्ध हैदराबाद क्वालिफायर 2 मध्ये खेळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
KKR vs SRH Live Updates: केकेआरचा हैदराबादवर विजय
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहचली आहे. केकेआरने हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 160 धावांचं आव्हान हे 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला पराभवानंतरही हैदराबादला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
-
KKR vs SRH Live Updates: सुनील नरीन माघारी
कोलकाताने दुसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. सुनील नरीन 21 धावा करुन माघारी परतला आहे.
-
-
KKR vs SRH Live Updates: रहमानुल्लाह गुरुबाज आऊट
कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीन आणि रहमानुल्लाह गुरुबाज या सलामी जोडीने 160 धावांचा पाठलाग करताना 44 धावा जोडल्या. त्यानंतर रहमानुल्लाह 14 चेंडूत 23 धावांवर आऊट झाला. टी नटराजनने कोलकाताला पहिली विकेट मिळवून दिली.
-
KKR vs SRH Live Updates: कोलाकाताची बॅटिंग सुरु, विजयासाठी 160 धावांचं आव्हान
सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 19.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 159 धावा केल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठी याने 55, एडन मारक्रम 32 आणि कॅप्टन पॅट कमिन्स याने अखेरच्या क्षणी नाबाद 30 धावांची खेळी केली. आता या विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी केकेआरकडून सुनील नरीन आणि गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
KKR vs SRH Live Updates: हैदराबाद पुन्हा बॅकफुटवर
हैदराबादने पहिल्या 5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठी याने अर्धशतक ठोकत हैदराबादचा डाव सावरला. मात्र त्यानंतर राहुल त्रिपाठी रन आऊट झाला. त्यांनतर पुढील बॉलवर सुनील नरीन याने सनवीर सिंह याला क्लिन बोल्ड केला. त्यामुळे हैदराबादची 13.3 ओव्हरमध्ये 7 बाद 121 अशी स्थिती झालीय.
-
-
KKR vs SRH Live Updates: हैदराबादचा अर्धा संघ तंबूत
हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. हेन्रिक क्लासेन रिंकू सिंह याच्या हाती कॅच आऊट झाला आहे. हेन्रिकने 21 बॉलमध्ये 32 रन्स केल्या.
-
KKR vs SRH Live Updates: मिचेल स्टार्कचा हैदराबादला झटका, सलग 2 झटके
मिचेल स्टार्क याने हैदराबादला 5 व्या ओव्हरमधील पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सलग 2 झटके दिले. स्टार्कने आधी नितीश रेड्डी याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर त्यानंतर शाहबाज अहमद याला क्लिन बोल्ड करत गोल्डन डक केलं. आता मिचेल स्टार्कला त्याच्या कोट्यातील पुढील ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेण्याची संधी आहे.
-
KKR vs SRH Live Updates: नितीश रेड्डी आऊट, हैदराबादला तिसरा धक्का
मिचेल स्टार्क याने नितीश रेड्डी याला आऊट करत हैदराबादला तिसरा झटका दिला आहे. मिचेलने यासह आपली दुसरी विकेट मिळवली. नितीशने 10 बॉलमध्ये धावा केल्या.
-
KKR vs SRH Live Updates: हैदराबादची ओपनिंग जोडी आऊट
केकेआरने हैदराबादच्या जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवा आहे . मिचेल स्टार्क याने आधी ट्रेव्हिस हेड याला आऊट केलं. त्यांनतर दुसऱया ओव्हरमध्ये वैभव अरोरा याने 3 धावांवर सचिनला आऊट केलं.
-
KKR vs SRH Live Updates: ट्रेव्हिस हेड डक, हैदराबादला मोठा धक्का
मिचेल स्टार्क याने केकेआरला निर्णायक सामन्यात पहिलीच आणि मोठी विकेट मिळवून दिली आहे. स्टार्कने ट्रेव्हिस हेड याला झिरोवर आऊट केलं.
-
KKR vs SRH Live Updates: ट्रेव्हिस हेड झिरोवर आऊट, हैदराबादला मोठा धक्का
केकेआरने हैदराबादला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मोठा झटका दिला आहे. मिचेल स्टार्क याने ट्रेव्हिस हेड याला क्लिन बोल्ड केलं.
-
KKR vs SRH Live Toss Updates: हैदराबादने टॉस जिंकला
सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध क्वालिफायर 1 सामन्यात टॉस जिंकला आहे. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
-
KKR vs SRH Head To Head : कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड टु हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यात एकूण 26 सामने झाले आहेत. या 26 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स वरचढ राहिली आहे. कोलकाताने हैदराबादवर 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने केकेआरवर 9 वेळा मात केली आहे.
-
KKR vs SRH Live Updates: सुनील नरीन आणि ट्रेव्हिस हेडच्या कामगिरीकडे लक्ष
कोलकाताचा ऑलराउंडर सुनील नरेन आणि हैदराबादचा विस्फोटक ओपनर ट्रेव्हिस हेड या दोघांनी आयपीएलच्या 17 व्या हंगामातील साखळी फेरीत धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या क्वालिफायर 1 मध्ये या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
KKR vs SRH Live Score: कोलकाता विरुद्ध हैदराबाद
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 17 व्या हंगामातील क्वालिफायर 1 सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत संघाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. पराभूत संघ एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या टीम विरुद्ध भिडेल.
Published On - May 21,2024 6:04 PM