IND vs AUS : वर्ल्डकपपूर्वी केएल राहुल याची जाहीर कबुली, या गोलंदाजाला खेळणं कठीण

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. दुसरीकडे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. अशात फॉर्मात असलेल्या केएल राहुल याने एक चिंता व्यक्त केली आहे. चला जाणून घेऊयात काय म्हणाला ते...

IND vs AUS : वर्ल्डकपपूर्वी केएल राहुल याची जाहीर कबुली, या गोलंदाजाला खेळणं कठीण
IND vs AUS : फॉर्मात असलेल्या केएल राहुल याला वर्ल्डकपपूर्वी सतावतंय या गोलंदाजाची चिंता, म्हणाला...
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 8:14 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर केएल राहुल याने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आशिया कपमधील कमबॅकच्या सामन्यात शतकी खेळी केली. केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रोहित शर्मा यांना चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया रंगात आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत केएल राहुल याने कर्णधारपद भूषवत सलग दोन अर्धशतक झळकावले. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वात तिसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. या दरम्यान फॉर्मात असलेल्या केएल राहुल याचा जिओ सिनेमाने मुलाखत घेतली. यावेळी त्याने कोणत्या गोलंदाजाची भीती वाटते याबाबत जाहीर कबुली दिली.

काय म्हणाला केएल राहुल?

कोणता गोलंदाज सर्वात जास्त त्रासदायक ठरतो? असा प्रश्न केएल राहुल याला विचारला गेला. त्यावर त्याने अफगाणिस्तानच्या स्टार फिरकीपटू राशिद खान याचं नाव घेतलं. राशिद खान आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. माजी क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा ऑल टाइम ग्रेट प्लेयर म्हणजेच GOAT असल्याचं सांगितलं आहे. तसेच सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना बघूनच खेळायची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं. दुसरीकडे एबी डिव्हिलियर्सकडून स्कूप शॉट उधारीत मिळाला तर बरं होईल असंही सांगितलं.

केएल राहुल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. आशिया कप स्पर्धेत शतकी खेळी केली. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 58 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात 52 धावा केल्या. केएल राहुल आतापर्यंत 60 वनडे सामने खेळला असून 57 सामन्यात बॅटिंग केली. यात 6 शतकं आइ 15 अर्धशतकं झळकावली आहेत. 112 हा सर्वोत्तम स्कोअर आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरोधात 11 ऑक्टोबरला सामना होणार आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.