KL Rahul IPL 2021 PK Team Player : रन्सचा पाऊस पाडायला के.एल. राहुल उत्सुक, पंजाब संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा!
के.एल. राहुलचे फटके नजाकतीने भरलेले असतात. तो ऑनसाईडला एवढा फरफेक्ट खेळतो की क्षेत्ररक्षकांच्या बाहुगर्दीतूनही चेंडू अलगद सीमारेषेला जाऊन धडकतो. | KL Rahul IPL 2021
मुंबई : के. एल. राहुल (k L Rahul), भारताचा आक्रमक बॅट्समन… सलामीला येऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या चिंधड्या उडवायच्या, पॉवरप्लेमध्ये बक्कळ धावा जमवायच्या, कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत धावा फटकवायच्या, अशा अनेक कारणांसाठी के. एल. राहुल प्रसिद्ध आहे. कर्नाटक रणजी संघात खेळताना त्याने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय. पुढे भारतीय संघात एकदिवसीय आणि टी ट्वेटीमध्ये समावेश झाल्यानंतर के.एल. राहुलने अविस्मरणीय खेळी केल्यात. त्याचे फटके नजाकतीने भरलेले असतात. तो ऑनसाईडला एवढा फरफेक्ट खेळतो की क्षेत्ररक्षकांच्या बाहुगर्दीतूनही चेंडू अलगद सीमारेषेला जाऊन धडकतो. त्याचे सिक्सरही पाहण्यासारखे असतात. तो ऑन साईडला खेळतोच खेळतो पण ऑफसाईडला तो तितक्याच ताकदीने खेळतो. त्याने मारलेला कव्हर ड्राईव्ह क्रिकेट रसिकांना विशेष भावतो. आयपीएलमध्ये के.एल.राहुल पंजाब किंग्स (Punjab Kings) या संघाकडून खेळतो तसंच पंजाब संघाचं नेतृत्वही करतो. आयपीएलच्या पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना के. एल. राहुलने अनेक यादगार इनिंग खेळल्या आहेत. एक नजर टाकूया त्याच्या क्रिकेट कारकीर्दीवर… (KL Rahul IPL 2021 PK Team Player Profile Stats ICC Ranking Photos VideosIndian Cricket Players Latest News in Marathi)
के.एल.राहुलने टेस्ट, वनडे आणि टी ट्वेन्टीत पदार्पण कधी?
कसोटी पदार्पण- के.एल.राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर 2014 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. वनडे पदार्पण- के.एल.राहुलने झिम्बाब्वेविरुद्ध जून 2016 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. टी ट्वेन्टी पदार्पण- के.एल.राहुलने झिम्बाब्वेविरुद्ध जून 2016 मध्ये टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
के.एल.राहुलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी
Format Match Inning Runs HS Strike rate Tests 36 60 2006 199 56.45 ODIs 36 35 1394 112 89.47 T20Is 49 45 1557 110* 142.19 IPL 81 81 2647 132* 135.81
के.एल. राहुलने आतापर्यंत 36 कसोटी मॅचेसमध्ये 56.45 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 6 रन्स केले आहेत. त्यातील 199 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 36 मॅचेसमध्ये 89.47 च्या सरासरीने 1 हजार 394 रन्स केले आहेत. त्यातील 112 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरलीय. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 49 मॅच खेळल्या आहेत. त्यात 1942. च्या स्ट्राईट रेटने त्याने 1 हजार 557 धावा फटकावल्या आहेत. त्यात नाबाद 110 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 81 सामन्यांत 135.81 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 647 रन्स केले आहेत. त्यात 132* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
पंजाब संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी के.एल.राहुलचा प्रयत्न
के.एल. राहुल पंजाब संघाचं नेतृत्व करतो. पंजाबमध्ये अनेक धडाकेबाज खेळाडू आहेत. केएलच्या साथीला युनिव्हर्स बॉस क्रिस गेल आहे. मनन व्होरा, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, असे अकापेक्षा एक खेळा़डू आहेत. 14 व्या मोसमात सगळ्या सहकाऱ्यांची मोट बांधत पंजाबला जेतेपद मिळवून देण्याचा के.एल. राहुल पुरेपुर प्रयत्न करेल.
आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून…
आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
(KL Rahul IPL 2021 PK Team Player Profile Stats ICC Ranking Photos VideosIndian Cricket Players Latest News in Marathi)
हे ही वाचा :