KL Rahul Athiya Wedding – टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी काल विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा पार पडला. निवडक पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हे लग्न झालं. बऱ्याच महिन्यांपासून या विवाहाची चर्चा होती. अथिया सुनील शेट्टी यांची कन्या आहे. या लग्नासाठी निवडलेलं विवाहस्थळ, मेन्यू आणि कोण पाहुणे आले? याची मीडियामध्ये चर्चा आहे. सध्या टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. पण वनडे सीरीज आणि त्यानंतर होणाऱ्या T20 मालिकेसाठी राहुलची टीममध्ये निवड केलेली नाही. लग्नानंतर राहुल ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये खेळणार आहे.
राहुलच्या आईची एंट्री बनली चर्चेचा विषय
या लग्नात केएल राहुलची आई राजेश्वरी यांची खंडाळ्यातील फार्म हाऊसवरील एंट्री चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर या एंट्रीची जोरदार चर्चा आहे. कारण राजेश्वरी या ज्या कारमधून आल्या, ती साधीसुधी कार नाहीय.
कारची किंमत किती कोटी?
राहुलची आई राजेश्वरी विवाहस्थळी पोहोचली, तेव्हा लोक पाहत बसले. त्याचं कारणही तसच आहे. लग्जरी कारसमध्ये गणना होणाऱ्या रॉल्स रॉयसमधून राजेश्वरी विवाह मंडपात पोहोचल्या. या कारची किंमत जवळपास 7 कोटीच्या घरात आहे. त्यांच्या रॉयल एंट्रीने सर्वांना थक्क केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सफेद रंगाच्या रॉल्स रॉयस कारमधून त्या लग्नस्थळी आल्या.
राहुलच्या लग्नाला ‘हा’ भारतीय क्रिकेटर उपस्थित
राहुल आणि आथियाच्या लग्नाला भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा उपस्थित होता. त्याशिवाय बॉलिवूड विश्वातील काही नावाजलेली स्टार मंडळी पोहोचली होती. सुनील शेट्टीचा मित्र अजय देवगण, संजय दत्त सुद्धा लग्नाला आले होते. संजय दत्तने टि्वटरवर पोस्ट करुन दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.