Video : केएल राहुल पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्यास सज्ज? चाहत्याच्या प्रश्नाला दिलं असं उत्तर
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. त्यात रिटेंशनबाबत माहिती समोर आल्यानंतर खेळाडूंना रिलीज केलं जाईल. तत्पूर्वी केएल राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याने आरसीबीबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
केएल राहुल गेल्या तीन पर्वात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळत आहे. कर्णधारपदाची धुरा त्याने यशस्वीरित्या पार पडली. पण मागच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्स आणि मालक संजीव गोयंका यांच्यात बिनसल्याचं चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे केएल राहुल यावर्षी फ्रेंचायझी सोडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची वाट धरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता केएल राहुल इशाऱ्यातून बरंच काही सांगून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. केएल राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळेल अशी शक्यता दिसत आहे. कारण आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावानंतर संघात मोठे बदल दिसणार यात शंका नाही. या दरम्यान केएल राहुलच्या एका चाहत्याने केएल राहुलवर या प्रश्नाचा भडिमार केला. अखेर केएल राहुलच्या मनातलं ओठात आलं आणि पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.
एका चाहत्याने केएल राहुलला विचारलं की, आरसीबी फ्रेंचायसी आवडते आणि पुन्हा एकदा राहुलला फ्रेंचायझीसोबत बघू इच्छितो. या प्रश्नावर केएल राहुलने सुरुवातीला काहीच उत्तर दिलं नाही आणि गप्प राहणं पसंत केलं. त्यानंतर केएल राहुलची अडचण समजून चाहत्याने पुन्हा विचारलं की, ‘ स्पष्ट सांगू नको, पण पुन्हा एकदा आरसीबीकडून चांगली कामगिरी करताना पाहू इच्छितो.’ तेव्हा केएल राहुल बोलता झाला आणि म्हणाला की, ‘अशी आशा करूयात.’ त्याच्या वाक्यात स्पष्टता नसली तरी सकारात्मक आशा वर्तवल्याचं दिसत आहे. म्हणजे लखनौ रिलीज केलं तर पहिली पसंती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असेल.
लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीच्या मेंटॉरपदी झहीर खानची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, केएल राहुल आणि मालक संजीव गोयंका यांच्याही भेटीगाठी झाल्या आहे
I’m happy that KL Rahul knows about the rumours that are going around for him & RCB.
Please boss change your IPL team! 🙏❤️ pic.twitter.com/Os06Uj39gQ
— Kunal Yadav (@Kunal_KLR) September 14, 2024
. मात्र केएल राहुल पुढच्या सत्रात संघाकडून खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. संजीव गोयंका यांनीही एका पत्रकार परिषदेत स्पष्ट काही सांगितलं नाही. पण केएल राहुल कुटुंबाचा भाग असल्याचं सांगितलं. दरम्यान, केएल राहुलची निवड बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघात झाली आहे. आता तो कशी कामगिरी करतो? याकडे लक्ष लागून आहे.