IND vs ENG | टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका, हा खेळाडू बाहेर!
India vs England Test Series 2024 | टीम इंडिया आणि इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला झटका लागला आहे.
मुंबई | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळणार आहे. त्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियातून अवघ्या 2 दिवसांच्या आतच हा स्टार खेळाडू बाहेर पडला आहे. तर त्याच्या जागी युवा खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडलेला खेळाडू आणि त्याच्या जागी संधी मिळालेला युवा फलंदाज हे दोघे नक्की कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. केएल राहुल याला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे त्याच्या जागी टीम इंडियात रजत पाटीदार याला संधी देण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला. यामध्ये रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांची एन्ट्री झाली. मात्र या दोघांसाठी फिटनेस टेस्ट आवश्यक होती. पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार केएल राहुल तिसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
केएलच्या जागी कुणाला संधी?
आता केएल बाहेर पडल्याने त्याच्या जागी टीममध्ये कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयने अद्याप केएल राहुल तिसरी कसोटी खेळणार नसल्याचं तसेच त्याच्या जागी बदली खेळाडू कोण असणार? याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार केएलच्या जागी युवा देवदत्त पडीक्कल याला संधी मिळाली आहे.
केएल राहुल पुन्हा आऊट
KL Rahul ruled out of the 3rd Test against England. [Express Sports]
– Devdutt Padikkal replaces KL Rahul in the team. pic.twitter.com/bLfReAnVj5
— Johns. (@CricCrazyJohns) February 12, 2024
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).
इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.