IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केएल राहुल विकेटकीपिंग करणार नाही, प्रशिक्षक द्रविडने सांगितलं कारण…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दृष्टीकोनातून टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धची मालिका खूपच महत्त्वाची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. त्यामुळे इंग्लंडला मात देत विजयी टक्केवारी सुधारण्याची संधी आहे. या सामन्यात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरु होत आहे. ही मालिका दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे. कारण या मालिकेवरून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग निश्चित होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापासून टीम इंडियामध्ये बदल अपेक्षित आहेत. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यात कौटुंबिक कारणामुळे खेळणार नाही. तर केएल राहुल विकेटकीपिंग करताना दिसणार नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल पण फक्त फलंदाज म्हणून..केएल राहुलला विकेटकीपिंग न देण्याचं कारण प्रशिक्षक राहुल द्रविड याने स्पष्ट केलं आहे. “मालिकेची स्थिती आणि वेळ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.” दक्षिण अफ्रिका दौऱ्यात दोन कसोटी सामन्यात केएल राहुलने विकेटकीपिंग केली होती. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत केएस भारत किंवा ध्रुव जुरेल यांच्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
“केएल राहुल या मालिकेत विकेटकीपर म्हणून खेळणार नाही. निवड करतानाच आम्ही ही बाब स्पष्ट केली आहे. आम्ही दोन विकेटकीपर संघ निवडीत घेतले आहेत. केएलने दक्षिण अफ्रिकेत चांगली कामगिरी केली आहे. सीरिज ड्रॉ करण्यात त्याचा मोठा हातभार आहे. आता पाच कसोटी सामने समोर आहेत. त्यामुळे विकेटकीपर निवडीसाठी दोन पर्यांयापैकी एक असेल. “, असं प्रशिक्षक राहुल द्रविड याने स्पष्ट केलं.
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. भारतीय खेळपट्ट्या तसं पाहिल्या तर फिरकीपटूंना मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे या खेळपट्ट्यांवर विकेटकीपिंग करणं वाटतं तितकं सोपं नाही. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग करणं अवघड आहे. दुसरीकडे, पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. त्यामुळे केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळेल.
पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान