धोनीला राग येतो तेव्हा तो काय करतो, जाणून घ्या…
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा वाद होताना आपण पाहिलं असेल. कर्णधार खेळाडूंना समजही देतो, हे क्रिकेटचं सर्व लाईव्ह प्रक्षेपण दिसत असतं. यात रागासंदर्भात एमएस धोनीनं भाष्य केलंय. सविस्तर वाचा...

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये (Cricket) राग हा फार काळ राहत नाही. जिंकण्याचं प्रेशर असल्यानं मैदानात काही काळासाठी राग येतो. पण, तो लगेच जातोही. कर्णधार (Captain) अनेकदा खेळाडूंना समज देताना दिसतो. यावेळी तो रागवतोही. पण, याची लगेच बातमी होऊन याकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. मात्र, या खेळाडूंमध्ये हा फक्त त्या क्षणाचा विषय असतो. नंतर पुन्हा हे खाळाडू जोमानं कामाला लागतात. याच विषयावर म्हणजेच रागाच्या विषयावर महेंद्र सिंग धोनीनं (MS Dhoni) भाष्य केलयं. तो नेमकं काय म्हणाला. जाणून घ्या…
धोनी काय म्हणाला?
धोनी म्हणाला की, जर खेळाडू मैदानावर 100 टक्के सतर्क असेल आणि त्यानंतरही त्यानं झेल सोडला तर मला काहीच अडचण नाही. साहजिकच त्याआधी सराव करताना त्यानं किती झेल घेतले हे मला पाहायचंय. जर त्याला कुठेतरी अडचण असेल आणि ती बरी होण्याचा प्रयत्न करत असेल. मी झेल सोडण्याऐवजी या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. त्या झेलमुळे आम्ही सामना गमावला असेल पण प्रयत्न नेहमी त्याच्या स्थितीत राहण्याचा आणि गोष्टी समजून घेण्याचा असतो.
मी पण माणूस…
धोनी म्हणाला की, ‘मी पण माणूस आहे. आतून मलाही तुम्हा सर्वांसारखेच वाटते. जेव्हा तुम्ही एकमेकांशी सामने खेळता तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. आम्ही आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आम्हाला वाईट वाटते पण आम्ही आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो.’
हेही वाचा….
2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2011 चा विश्वचषक जिंकला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीनं संघाला दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढले आणि नाबाद राहताना संघाला विजयापर्यंत नेले.