Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolkata Knight Riders, IPL 2022: श्रेयसच्या नेतृत्वात KKR चा संघ धोकादायक, अशी असेल Playing XI

2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) गेल्या 8 वर्षांपासून चॅम्पियनपदापासून वंचित रहावे लागले आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली हा संघ दोनदा चॅम्पियन बनला, मात्र त्यानंतर या संघाची प्रत्येक वेळी निराशाच झाली आहे.

Kolkata Knight Riders, IPL 2022: श्रेयसच्या नेतृत्वात KKR चा संघ धोकादायक, अशी असेल Playing XI
Shreyas IyerImage Credit source: KKR TWITTER
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:51 PM

मुंबई : 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) गेल्या 8 वर्षांपासून चॅम्पियनपदापासून वंचित रहावे लागले आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली हा संघ दोनदा चॅम्पियन बनला, मात्र त्यानंतर या संघाची प्रत्येक वेळी निराशाच झाली आहे. पण आता या फ्रँचायझीने एका नवीन तरुण आणि प्रतिभावान खेळाडूला कर्णधार बनवले आहे, ज्या खेळाडूमध्ये या संघाला चॅम्पियन बनवण्याची ताकद आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल (IPL 2022) मध्ये प्रवेश करणार आहे कोलकात्याने लिलावातून खरेदी केलेली खेळाडूंची फौज श्रेयसची ताकद दुप्पट करतील. कोलकाता नाईट रायडर्सने आपले चार महत्त्वाचे खेळाडू कायम ठेवले आहेत. आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण. हे चारही खेळाडू मोठे मॅचविनर आहेत आणि त्यानंतर संघाने लिलावात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंना खरेदी केले आहे.

पॅट कमिन्स, नितीश राणा, रिंकू सिंग, सॅम बिलिंग्ज, अॅरोन फिंच, मोहम्मद नबी अशी नावे या संघात आहेत. आता प्रश्न असा आहे की श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरणार? कोलकात्याची सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हन कोणती असेल? या प्रश्नाचे उत्तर TV9 मराठी तुम्हाला देईल. चला तर मग कोलकात्याच्या (Kolkata Knight Riders best Playing 11) सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया.

टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये कोण असणार?

प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झाल्यास, कोलकाता संघ व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायणला सलामीला उतरवू शकतो. नारायणने नुकतीच बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. हे पाहता नारायणवर पुन्हा एकदा सलामीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच कोलकात्याकडे अॅरॉन फिंच हादेखील चांगला पर्याय आहे जो अॅलेक्स हेल्सच्या जागी संघात सामील झाला आहे. आता केकेआरची सलामी कोणाला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र नारायण आणि वेंकटेशची संघातली जागा पक्की आहे. कोलकात्याकडे अजिंक्य रहाणे हादेखील पर्याय आहे, मात्र त्याचा गेल्या दोन वर्षांमधला फॉर्म पाहता रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं मुश्किल आहे. कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर उतरेल, तर चौथ्या क्रमांकावर नितीश राणा खेळेल. यष्टिरक्षणाची जबाबदारी शेल्डन जॅक्सनवर सोपवली जाऊ शकते, जो चांगली फलंदाजीही करतो.

KKR चा अष्टपैलू गोलंदाज कोण?

केकेआरचा सर्वात मोठा मॅच विनर असेल आंद्रे रसेल. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असणं निश्चित आहे. पॅट कमिन्स देखील या संघाचा भाग असणार आहे. गोलंदाजांमध्ये उमेश यादव, शिवम मावी हे प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतात. त्याचबरोबर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीही या संघाची ताकद वाढवतो.

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – अॅरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

इतर बातम्या

Rajasthan Royals, IPL 2022: बॅटिंग दमदार, गोलंदाजीत धार, राजस्थान रॉयल्स मजबूत Playing 11 सह करणार वार!

Sunrisers Hyderabad, IPL 2022: केन विलियमसनची Playing 11 तयार? जाणून घ्या SRH टीममधले दावेदार

IPL 2022: विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी प्रॅक्टिससाठी येणार ठाण्यात, एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.