भारताचा हा खेळाडू आता विदेशी संघाकडून खेळणार क्रिकेट, झालं असं की…
टीम इंडियात चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. एक खेळाडू अपयशी ठरला तर त्याची जागा घेण्यासाठी दुसरा तयारच असतो. असाच एक खेळाडू गेल्या वर्षभरापासून टीम इंडियात जागा मिळेल या प्रतिक्षेत आहे. पण जागा न मिळाल्याने आता विदेशी संघाकडून खेळताना दिसणार आहे.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नवं वळण देण्याचा निर्णय घेता आहे. केएस भरत आता विदेशी संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याला गेल्या वर्षभरापासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच आयपीएल 2025 स्पर्धेतही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे क्रिकेट कारकिर्दील नवी उभारणी देण्यासाठी नवीन संघात सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. त्याने सोशल मिडिया अकाउंटवरून एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. आता इंग्लंडच्या प्रतिष्ठित सरे चॅम्पियनशिप डुलविच क्रिकेट क्लबकडून खेळताना दिसणार आहे. केएस भरत गेल्या एक वर्षापासून भारतीय कसोटी संघाबाहेर आहे. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांतर ऋषभ पंतचं संघात आगमन झालं आणि तेव्हापासून केएस भरत संघातून गायब आहे. आताही त्याला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे.
सरे चॅम्पियनशिप स्पर्धा खूपच रोमांचक असते. तसेच इथली क्रिकेट मैदानं भारतीय खेळपट्टीपेक्षा खूपच वेगळी असतात. अशात भरतला तांत्रिक बदलासह नवा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नवी उभारणी मिळण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे, क्लबने भरतला आपल्या संघात घेत एक मजबूत विकेटीकपर फलंदाज मिळवला आहे. भरत मधल्या फळीत चांगली भूमिका बजावू शकतो. भरतचा अनुभव आणि सामन्यातील त्याची समज दुलविचसाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जर केएस भरतने या स्पर्धेत चांगली कमागिरी केली तर त्याचा पुन्हा विचार होऊ शकतो.
View this post on Instagram
केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 2023 मध्ये केली होती. यात टीम इंडियासाठी त्याने 7 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 20.09 च्या सरासरीने 221 धावा केल्या आहेत. यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. दरम्यान त्याने आपल्या विकेटकीपिंगच्या शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने या सात सामन्यात 18 झेल आणि 1 यष्टीचीत केला आहे.