इंग्लंडविरूद्ध ठोकलेलं शतक ‘या’ खेळाडूकडून प्रभू श्रीरामाला अर्पण, व्हिडीओ तुफान व्हायरल

KS Bharat Hundread : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने इंग्लंड विरूद्ध धमाकेदार शतक ठोकलं आहे. शतक झाल्यानंतर पठ्ठ्याने थेट श्री रामालाच शतक अर्पण केलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंग्लंडविरूद्ध ठोकलेलं शतक 'या' खेळाडूकडून प्रभू श्रीरामाला अर्पण, व्हिडीओ तुफान व्हायरल
KS Bharat Hundread England lions
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 8:45 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका येत्या 25 जानेवारीला सुरू होणार आहे. या मालिकेआधी भारत अ संघ आणि इग्लंड लायन्स संघात सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूने शतक मारलं आहे. या खेळाडूच्या शतकाची जोरदार चर्चा होत आहे. कारण या खेळाडूने हे शतक प्रभू श्रीरामाच्या नावावर केलं आहे. सामन्यातील शतकानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोण आहे तो टीम इंडियाचा शतक करणारा खेळाडू ज्याने प्रभू श्रीरामाला शतक अर्पण केलं.

पाहा व्हिडीओ:-

केएस भरत याने इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध 165 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या शतकानंतर भरत याने प्रभू रामाल शतक अर्पण केल्याने त्याचं कौतुक होत असलेलं पाहायला मिळत आहे. कारण देशभरात राम मंदिराच्य उद्घाटनामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

केएस भरत याच्या शतकामुळे आता येत्या कसोटी सामन्यात त्याची प्लेइंग 11 मध्ये वर्णी लागते की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्य दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या संघात तीन विकेटकीपरचा समावेश आहे. यामध्ये केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि केएस भरत यांचा समावेश आहे.

पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान

टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली पोप. रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.