IND vs AUS, 4th Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना बाकी आहे. 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. केएल राहुलनंतर टीम इंडियातील आणखी एक खेळाडूला ड्रॉप केलं जाऊ शकतं. अहमदाबादमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात या प्लेयरला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांचा हा विश्वासू खेळाडू समजला जातो. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
तिन्ही कसोटी सामन्यात त्याचा संघर्ष
इंदोर टेस्ट मॅच नंतर विकेटकीपर फलंदाज केएस भरतचा टीममधून पत्ता कट होऊ शकतो. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा केएस भरतला ड्रॉप करुन त्याच्याजागी इशान किशनला संधी देऊ शकतो. केएस भरत ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत बॅटने फ्लॉप ठरला होता. या तिन्ही कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करताना संघर्ष करताना दिसला.
सातत्याने फेल
इंदोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात तो 17 आणि 3 धावा करुन बाद झाला. केएस भरत्या बॅटिंगमध्येही कुठलाही एक्स फॅक्टर दिसत नाही. ऋषभ पंत आणि इशान किशन एका सेशनमध्ये मॅचची दिशा बदलू शकतात. मीडल ऑर्डरमध्ये केएस भरत ज्या नंबरवर बॅटिंग करतोय, तिथे टीम इंडिया आपल्या स्फोटक फलंदाजाला मिस करतेय. केएस भरत नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत 8,6,23, 17 आणि 3 धावाच करु शकलाय. टीम इंडियाला सध्याच्या घडीला केएस भरतपेक्षा आक्रमक विकेटकीपर फलंदाजाची गरज आहे.
त्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजाची गरज
बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी 23 वर्षाच्या इशान किशनची निवड झाली आहे. ऋषभ पंत अपघातामुळे पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. टीम इंडियाला लोअर ऑर्डरमध्ये एका स्फोटक बॅट्समनची आवश्यकता आहे. त्यामुळेच इशान किशनचा टीममध्ये समावेश करण्यात आला. पण सुरुवातीच्या 3 कसोटी सामन्यात इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही. इशानच्या जागी केएस भरतला संधी दिली. पण तो प्रभाव पाडू शकला नाही.