पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेत अंकित बावनेने पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर आता 10 दिवसात अंकितने पुन्हा कमाल केलीय. त्याने एमएस धोनीच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. धोनीच्या या बॉलरला IPL मध्ये 1 कोटी 20 लाख रुपये सॅलरी मिळते. त्याचं नाव आहे, प्रशांत सोलंकी. त्याच्या विरोधात अंकित बावनेने एकाच ओव्हरमध्ये 6 चौकार मारले.
अंकित बावनेने प्रशांत सोलंकीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. काल MPL 2023 मध्ये कोल्हापूर टस्कर्स आणि ईगल नाशिक टायटन्समध्ये मॅच झाली. अंकित बावने कोल्हापूर टस्कर्सकडून खेळतो. प्रशांत सोलंकी ईगल नाशिक टायटन्स टीमचा भाग आहे.
नाशिक टायटन्सने किती धावांच लक्ष्य दिलं?
10-10 ओव्हरच्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 9 विकेट गमावून 89 धावा केल्या. कोल्हापूर टस्कर्सच्या टीमने 9 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. कोल्हापूर टस्कर्सला 92 धावांपर्यंत पोहोचवण्यात अंकित बावनेने महत्वाची भूमिका बजावली. त्याने 27 चेंडूत नाबाद 62 धावा फटकावल्या. त्याने शानदार अर्धशतक झळकावलं. 230 च्या स्ट्राइक रेटने अंकितने इनिंगमध्ये 11 चौकार आणि 1 सिक्स मारला.
Brilliant Bawne smashes maiden 100 of @mpltournament
.
.#MPLonFanCode #AnkeetBawne pic.twitter.com/6W5P29o9b5— FanCode (@FanCode) June 17, 2023
कितीव्या ओव्हरमध्ये मारले 6 फोर?
कोल्हापूर टस्कर्सची इनिंग सुरु असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये अंकित बावनेची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. त्याने एकूण 11 चौकार मारले. पण 6 बॉलमध्ये 6 फोरची स्क्रिप्ट त्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये लिहिली. ईगल नाशिक टायटन्सकडून प्रशांत सोलंकी ही ओव्हर टाकत होता. 10 ओव्हरमध्ये प्रशांत सोलंकीने आपल्या कोट्यातील 2 ओव्हर टाकल्या. त्याने एकूण 30 धावा दिल्या. यात 24 रन्स 1 ओव्हरमध्येच आले.
MPL 2023 कुठल्या टीम विरुद्ध पहिली सेंच्युरी?
ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध अंकित बावने कोल्हापूर टस्कर्सच्या विजयाचा हिरो ठरला. अंकित बावनेने याच स्पर्धेत टुर्नामेंटमधील पहिलं शतक झळकावलं होतं. त्याचं T20 करियरमधील हे पहिलं शतक होतं. रत्नागिरी जेट्स विरुद्ध 17 जूनला झालेल्या सामन्यात अंकित बावनेने ही कमाल केली होती.