Kuldeep Yadav : भारताचा कुल ‘दीप’ चमकला, चार विकेट्स घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड
Kuldeep Yadav World Record : कुलदीपच्या फिरकी गोलंदाजीने पुन्हा एकदा कमाल करून टीम इंडियाला लंकेविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयाच्या मदतीने टीम इंडियाने आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कुलदीपने मोठा विक्रम आपल्यास नावावर केला आहे.
मुंबई : आशिया कपमधील सुपर 4 च्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांनाही पराभूत करुन आशिया कपच्या फायनल प्रवेश केला आहे. श्रीलंका विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडिया समोर केवळ 213 रन्स डिफेन्ड करण्याचं कठीण आव्हान होतं. पण कुलदीपच्या फिरकी गोलंदाजीने पुन्हा एकदा कमाल करून टीम इंडियाला लंकेविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयाच्या मदतीने टीम इंडियाने आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कुलदीपने मोठा विक्रम आपल्यास नावावर केला आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीप यादवने आपल्या कमालीच्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवल होतं. तर कुलदीप यादवने काल लंकेविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यात 4 विकेट्स घेवून टीम इंडियाला विजय मिळवून दिला, तसेच त्याने या विकेट्सच्या मदतीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 150 विकेट्स घेतल्या.
फक्त 88 डावांमध्ये त्याने 150 विकेट्स घेतल्या. या सोबत त्याने आपल्या नावावर वन-डे सामन्यात जलद 150 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. याआधी बांग्लांदेशचा अब्दुल रझ्झाक याच्या नावे हा रेकॉर्ड होता. रज्जाकला वन-डे मध्ये 150 विकेट्स घ्यायला 108 सामन्यांचा कालावधी लागला होता. पण आता कुलदीप यादवने रझ्झाकचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
वन-डे सामन्यांत कमीत कमी सामन्यांत 150 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दोन भारतीयांचा समावेश झाला आहे. कुलदीप यादव – 88 सामने , अब्दुल रज्जाक – 108 सामने , ब्रॅड हॉग – 118 सामने , शकिब अल हसन – 119 सामने , रवींद्र जडेजा – 129 सामने अशी यादी आहे.
कुलदीपने दिलं हेटर्सना सडेतोड उत्तर :
कुलदीप यादवच्या सुंदर फिरकी गोलंदाजीने कुलदीप यादवने बॅट्समनला आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचायला भाग पाडल होतं. कुलदीपच्या फिरकी गोलंदाजीच्या जादूची चर्चा सर्वत्र होतं आहे. याआधी चहलला डावलून कुलदीपला संघात स्थान का दिलं? असे प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित केले होते. पण आता कुलदीपने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर अनेकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
दरम्यान, टीम इंडिया आता येत्या 15 सप्टेंबरला बांग्लादेश विरुद्ध सुपर 4 मधील सामना खेळणार आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला मात देवून आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता टीम इंडिया समोर श्रीलंका येणार की पाकिस्तान हे पाहणं रंजक ठरणार आहे. आतापर्यंतर झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि पाकिस्तान हे कट्टर विरोधक एकदाही आमने सामने आलेले नाही. या वेळेस जर हे दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले तर क्रिकेट प्रेमींचा आनंदाला चार चांद लागतील.