IPL 2022, DC vs PBKS, Purple Cap : पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कुलदीप यादवची आगेकूच, कोण अव्वल, कुणाची पिछेहाट?

| Updated on: Apr 21, 2022 | 7:49 AM

आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. दरवर्षी याकडे क्रीकेट प्रेमी विशेष लक्ष देतात.  कालच्या सामन्यानंतर देखील पर्पल कॅपच्या टेबलमध्ये बदल झालाय. 

IPL 2022, DC vs PBKS, Purple Cap : पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कुलदीप यादवची आगेकूच, कोण अव्वल, कुणाची पिछेहाट?
कुलदीप सेन
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. दरवर्षी याकडे क्रीकेट प्रेमी विशेष लक्ष देतात.  कालच्या सामन्यानंतर देखील या टेबलमध्ये बदल झालाय. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल दिल्ली कॅपिटल्सने (DC) पंजाब किंग्सला (PBKS) सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पंजाब किंग्सला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरने जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने नऊ विकेट राखून हा सामना जिंकला. वॉर्नर आणि शॉ ने वेगाने धावा जमवल्या. त्यामुळे 11 षटकातच दिल्लीने विजयी लक्ष्य गाठलं. दिल्लीने फक्त दोन पॉइंटच मिळवले नाहीत, तर त्यांच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सहा सामन्यात त्यांचा हा तिसरा विजय आहे. पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव आहे. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने नाबाद 60, पृथ्वी शॉ ने 41 आणि सर्फराझ खानने नाबाद 12 धावा केल्या. तर खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, ललित यादव यांनी प्रत्येकी दोन, तर मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतली. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय.

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे.  त्याने आतापर्यंत सतरा विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर कालच्या सामन्यानंतर टेबलमध्ये सुधारणा होऊन कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी आलाय. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये तेरा विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने बारा विकेट घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर आवेश खान आहे. त्याने अकरा विकेट घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्यानेही अकरा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

सात धावात चार विकेट

33 ते 54 या 21 धावात पंजाबने चार विकेट गमावल्या. त्यानंतर 85 ते 92 दरम्यान सात धावात चार विकेट गमावल्या. पंजाबकडून विकेटकिपर जितेश शर्माने सर्वाधिक 32 धावा केल्या. राहुल चाहरने अखेरीस एक चौकार आणि एक षटकार लगावल्यामुळे पंजाबला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. दिल्लीकडून खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, ललित यादव यांनी प्रत्येकी दोन, तर मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतला. पंजाब किंग्सचा डाव 115 धावात आटोपला.

इतर बातम्या

मोठी बातमी! धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा, खंडणी मागणारी महिला कोण?

Red Fort : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार; भाजपसाठी ते महत्वाचंच! कारण…

Delhi Crime: दिल्लीत भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; पोलीस स्टेशनजवळच सहा गोळ्या झाडल्या