कुलदीप यादवने पाच गडी टीपल्यानंतर सूर्यकुमार यादवला आठवला चहल इफेक्ट! कॅमेऱ्यासमोरच थेट विचारलं…

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील टी20 मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. पहिला सामना पावसामुळे वाया गेला, तर दुसरा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव जोडीने दक्षिण अफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं.

कुलदीप यादवने पाच गडी टीपल्यानंतर सूर्यकुमार यादवला आठवला चहल इफेक्ट! कॅमेऱ्यासमोरच थेट विचारलं...
पाच विकेट्सचा चहलशी काय संबंध? सूर्यकुमार यादवच्या प्रश्नावर कुलदीप यादवने दिलं असं उत्तर
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 6:58 PM

मुंबई : दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका बरोबरीत रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. तीन सामन्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवली. या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. दुसरीकडे, कुलदीप यादवने पाच गडी बाद करत दक्षिण अफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी सूर्यकुमार यादवने त्याला बरेच प्रश्न विचारले. कुलदीप यादवने पाच गडी बाद केल्यानंतर सूर्यकुमार यादवने थेट कुलदीपला यादवला प्रश्न विचारला. “हा कुठे युजवेंद्र चहलचा इफेक्ट तर नाही ना? युजवेंद्र चहल वनडे मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेत आला आहे. तू त्या भेटला आणि लगेच पाच गडी बाद केले. तुमचं दोघांचं काही वेगळं कनेक्शन वाटत आहे.” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

“चहल लांबचा प्रवास करून दक्षिण अफ्रिकेत आला आहे. म्हणून मी त्याला संध्याकाळी भेटलो. जास्त काही बोलणं झालं नाही. तो म्हणाला गोलंदाजी चांगली होत आहे. जास्त काही करण्याची गरज नाही. जास्त विचार करण्याची गरज नाही. त्याचा कायमच मला सपोर्ट राहिला आहे.काही वर खाली झालं तर तो सांगत असतो. कालही त्याला भेटलो तेव्हा त्याने तसंच सांगितलं.वनडेत एकत्र खेळण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल.”, असंही कुलदीप यादव म्हणाला.

तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 7 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयसाठी 202 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 95 धावांवर बाद झाला. या सामन्यात कुलदीप यादवने 2.5 षटकात 17 धावा देत 5 गडी बाद केले. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कुलदीप यादवचा हा सर्वोत्तम स्पेल होता. कुलदीप यादवने 34 टी20 सामन्यात 58 गडी बाद केले. एका सामन्यात 17 धावा देत 5 गडी बाद करणं हा सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीप यादवने 101 वनडे सामन्यात 167 गडी बाद केले आहेत. यात 25 धावा देत 6 गडी बाद करणं ही सर्वोत्तम खेळी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.