Kusal Mendis चं वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक, धोकादायक पाकिस्तानी गोलंदाजांचा माज उतरवला
Kusal Mendia Fastest Cnetury PAK vs SL | कुसल मेंडीस याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडून काढल्यानंतर त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचीही अंहकार मोडून काढलाय.
हैदराबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आठव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. श्रीलंका कॅप्टन दासून शनाका याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवला. श्रीलंकेने पहिली विकेट लवकर गमावली. श्रीलंकेचा 5 स्कोअर असताना कुसल परेरा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची शतकी भागीदारी केली. मात्र त्यांनतर पाथुम निसांका यानेही मैदानाबाहेरचा रस्ता धरला. निसांका याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.
त्यानंतर कुसल मेंडीस आणि सदीरा समरविक्रमा याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चागंलाच समाचार घेतला. कुसलनेतर टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत पाकड्यांच्या गोलंदाजांना झोडून काढला. कुसलने मैदानात चौफेर फटकेबाजी करत मोठ्या दिमाखात शतक पूर्ण केलं. कुसलने सिक्सह वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक पूर्ण केलं. कुसलने अवघ्या 65 बॉलमध्ये 13 चौकार आणि 4 गगनभेदी षटकांराच्या मदतीने आणि 153. 85 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. कुसलच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे तिसरं शतक शतक ठरलं.
वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक
दरम्यान कुसल मेंडीस वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेकडून वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. कुसलने याबाबतीत माजी कर्णधार कुमार संगकारा आणि इतर दिग्गजांना मागे टाकलंय. कुमार संगकारा याने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 70 आणि बांगलादेश विरुद्ध 73 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. तसेच महेला जयवर्धने याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये कॅनडा विरुद्ध 80 टीम इंडिया विरुद्ध 84 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली होती.
कुसल मेंडीस याचं वेगवान आणि ऐतिहासिक शतक
Masterclass by Kusal Mendis 🔥 Celebrating his 3rd ODI century with style! 💯
🚨 This is the fastest-ever hundred by a Sri Lankan in Cricket World Cup history!#LankanLions #CWC23 #SLvPAK pic.twitter.com/UNOsE6ag9B
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 10, 2023
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.