हैदराबाद | सदीरा समरविक्रमा आणि कुसल मेंडीस या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंका टीमने पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 344 धावा केल्या. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने 108 आणि कुसल मेंडीस याने 122 धावांची धुव्वादार शतकी खेळी केली. या दोघांच्या शतकाच्या मदतीने श्रीलंकेने 300 पार मजल मारली. आता पाकिस्तान या 345 धावांचं कशाप्रकारे पाठलाग करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
श्रीलंकेकडून ओपनर बॅट्समन पाथुम निसांका याने 61 बॉलमध्ये 51 धावा केल्या. कुसल परेरा आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. कुसल मेंडीस याने 77 बॉलमध्ये 14 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 122 धावांची वादळी खेळी केली. सदीरा समरविक्रमा 89 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्ससह 108 धावा करुन बाद धाला. चरिथ असलंका 1 धाव करुन आऊट झाला. धनंजया डी सिल्वा याने 25 धावांचं योगदान दिलं.
कॅप्टन दासून शनाका याने 18 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. दुनिथ वेल्लालागे याने 12 धावा जोडल्या. महीश तीक्ष्णा याला भोपळाही फोडता आला नाही. तर मथीशा पथिराणा 1 धावेवर नाबाद राहिला. तर पाकिस्तानकडून हसन अली याने सर्वाधिक 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हसनने 10 ओव्हरमध्ये 71 धावांच्या मोबदल्यात या 4 विकेट्स घेतल्या. हरीस रौफ याने 2 विकेट्स घेतल हसनला चांगली साथ दिली. तर शाहीन अफ्रदी, मोहम्मद नवाझ आणि शादाब खान या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.
कुसल-सदीराची तोडफोड बॅटिंग
Sri Lanka posts a challenging 344/9 after 50 overs. 🏏 Now, it’s time to defend the target!#LankanLions #SLvPAK #CWC23 pic.twitter.com/pIiThCUWbn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 10, 2023
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.