IND vs AFG: टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहितचा मोठा खुलासा, म्हणाला, “2 वर्षां…”
AFG vs IND Rohit Sharma: टीम इंडियाने सुपर 8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं. या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने सुपर 8 मोहिमेतील सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 47 धावांनी मात करत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाने अफगाणिस्तानला शेवटच्या बॉलवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 134 धावांवर गुंडाळलं. अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या ही चौकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. अर्शदीप आणि जसप्रीत या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी सूर्यकुमार यादव याने 53 आणि हार्दिक पंड्याने 32 धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाच्या बार्बडोसमधील या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माने मोठा खुलासा केला.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“2 वर्षांआधी जेव्हा आम्ही येथे खेळलो होतो, त्यामुळे आम्हाला खेळपट्टीबाबत माहिती झाली होती. त्यानुसार आम्ही योजना आखली आणि 180 आसपास धावा केल्या. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि गोलंदाजांनी धावसंख्येचा शानदार बचाव केला. तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनी केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. तेव्हा कुणीतरी शेवटपर्यंत खेळण्याची गरज होती”, असं रोहित शर्मा म्हणाला.
दरम्यान टीम इंडिया आता सुपर 8 मधील दुसरा सामना हा बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 22 जून रोजी खेळणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलचं तिकीट निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश या सामन्याची प्रतिक्षा लागून आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झझई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.