वर्ल्डकप विजेत्या संघासाठी BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लतादीदींनी दिलेला मदतीचा हात

तो काळ होता जेव्हा 1983 चा. जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून भारतात परतत होता. खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांना बक्षीस दिलं जाणार होतं. परंतु बीसीसीआयकडे त्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा लता मंगेशकर यांनी विश्वचषक विजयाचा आपला आनंद कृतीतून व्यक्त केला.

वर्ल्डकप विजेत्या संघासाठी BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लतादीदींनी दिलेला मदतीचा हात
Lata Mangeshkar
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 12:43 PM

मुंबई : गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला (Lata Mangeshkar Passed Away). मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. लता मंगेशकर त्यांच्या मृदू स्वभावासाठी ओळखल्या जायच्या, त्या हळव्या मनाच्या होत्या. लता दीदींचं मन मोठं होतं. याच्याशी संबंधित एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लता मंगेशकर यांनी एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) खेळाडूंच्या पुरस्कारासाटी निधी उभारण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी बीसीसीआयकडे आपल्या चमकदार क्रिकेटपटूंना बक्षीस देण्यासाठी पुरेसे पैसा नव्हते. त्यामुळे लतादीदींनी मदतीचा हात पुढे केला होता.

खरे तर लता मंगेशकर यांना क्रिकेट पाहण्याची आवड आहे, त्यामुळे त्यांच्या मनात क्रिकेट आणि खेळाडूंसाठी विशेष स्थान आहे. तो काळ होता जेव्हा 1983 चा. जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून भारतात परतत होता. खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांना बक्षीस दिलं जाणार होतं. परंतु बीसीसीआयकडे त्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा लता मंगेशकर यांनी विश्वचषक विजयाचा आपला आनंद कृतीतून व्यक्त केला.

…आणि लता मंगेशकरांनी बीसीसीआयला मदत केली

दिवंगत रणजीपटू समर सिंह आणि हर्षवर्धन यांच्या बायोग्राफीनुसार, माजी केंद्रीय मंत्री एन. के. पी. साळवे यांनी खुलासा केला होता की, 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला बक्षीस देण्याची वेळ आली होती, पण त्यावेळी बोर्डाकडे पैसे नव्हते. 1982-85 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या साळवे यांच्या म्हणण्यानुसार, “त्यावेळी सर्वजण खूप नाराज होते. अशा परिस्थितीत या कामासाठी पैसे उभे करण्याची कल्पना राजसिंह डुंगरपूर यांना सुचली. त्यासाठी त्यांनी लता मंगेशकर यांना दिल्लीत कॉन्सर्ट करण्याची विनंती केली. कारण त्या काळात बीसीसीआयकडे निधी नव्हता.

लता मंगेशकरांचं मोठं मन

साळवे म्हणाले, “लताजींना जेव्हा ही ऑफर दिली तेव्हा त्यांनी लगेच ती मान्य केली. त्यावेळी लताजींनी बीसीसीआयला खेळाडूंच्या बक्षीसाची रक्कम वाढवण्यास मदत केली. ज्यामधून विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले गेले. 1983 च्या काळात काळात रक्कम खूप मोठी होती. बक्षीसाची रक्कम पाहून खेळाडूंनाही खूप आनंद झाला होता.

इतर बातम्या

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.