मुंबई : कालच्या सामन्यात पंजाब (PBKS) विरुद्द लखनौ सुपर जायंट्सचा सुपर (LSG) विजय झाला. यानंतर आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील पॉईंट्स टेबलमध्य लखनौ तिसऱ्या स्थानी गेलाय. तर पंजाबची पिछेहाट झालीय. लखनौच्या संघाने गोलंदाजांच्या दमावर विजय मिळवल्यामुळे लखनौ आता पॉईंट्स टेबलमध्ये आगेकूच केलीय. लखनौच्या 154 धाावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला वीस ओवरमध्ये 133 धावाच बनवता आल्या. पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 28 चेंडूत 32 धावा काढल्या. यात त्याने 5 चौकार मारले. तर मयंक अग्रवालने 17 चेंडूत 25 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर ऋषी धवनने 22 चेंडूत 21 धावा काढल्या. त्यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, अखेर पंजाबला टार्गेट पूर्ण करता आलं नाही आणि 20 धावांनी लखनौचा सुपर विजय झाला. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झालाय ते पाहुया.
आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स आहे. या संघाने एकूण आठ सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यात त्यांना यश आलंय तर एक सामना त्यांनी गमावलाय. त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये 14 पॉईंट्स आहेत. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स असून या संघाने एकूण आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांचा सहा सामन्यात विजय झालाय. तर दोन सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. तिसऱ्या स्थानी लखनौ असून कालच्या विजयानंतर लखनौची आगेकूच झाली आहे. लखनौने एकूण नऊ सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात लखनौ विजयी असून तीन सामन्यात त्यांना अपयश आलंय. चौथ्या स्थानी सनरायजर्स हैदराबाद संघ आहे. या संघाने एकूण आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात त्यांना विजय मिळालाय. तर तीन सामने हैदराबाद पराभूत झालाय, पाचव्या स्थानी बंगलौरचा संघ आहे. या संघाने एकूण नऊ सामने खेळले असून पाच सामन्यात त्यांना यश आलंय तर चार सामने बंगलौरला पराजयाचा सामना करावा लागलाय.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 8 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या. लखनौ संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉकने 47 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि राहुल चहर यांनी मिळून 6 विकेट घेतल्या. रबाडाने 4 आणि चहरने दोन गडी बाद केले होते. मात्र, अखेर पंजाबला टार्गेट पूर्ण करता आलं नाही आणि 20 धावांनी लखनौचा सुपर विजय झाला.