IAS ची परीक्षा पास झालेला भारतीय संघातील खेळाडू कोण?
हिंदीमध्ये एक म्हण आहे 'खेलोगे कूदोगे तो होओगे खराब और पढ़ोगे, लिखोगे तो बनोगे नवाब...!' पण भारतीय संघात असा एक क्रिकेटर होता की तो खेळण्यातही पुढे होता आणि अभ्यासातही! त्याचं नाव अमय खुरासिया... (left handed indian cricketer Amay Khurasiya cleared IAS Exam)
मुंबई : हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘खेलोगे कूदोगे तो होओगे खराब और पढ़ोगे, लिखोगे तो बनोगे नवाब…!’ पण भारतीय संघात असा एक क्रिकेटर होता की तो खेळण्यातही पुढे होता आणि अभ्यासातही! त्याने केवळ पदवीच संपादन केली नाही तर त्याने देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी IAS परीक्षा पास केली. यानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात एन्ट्री केली. या खेळाडूचं नाव आहे अमय खुरासिया (Amay Khurasiya). 90 च्या दशकात तो भारतीय संघासाठी क्रिकेट खेळायचा… (left handed indian cricketer Amay Khurasiya cleared IAS Exam)
IAS परीक्षा पास, मोठ्या पदावर नियुक्ती
अमय खोरासियाचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. तो डावखुरा फलंदाज होता. त्याच्याकडे जलद धावा करण्याची कला होता. परंतु भारतीय संघात स्थान मिळवण्यापूर्वी त्याने आयएएस परीक्षा पास केली आणि भारतीय सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक पदावर त्याची नेमणूक झाली.
1989-1990 च्या हंगामापासून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, तो 2004-2005 च्या हंगामापर्यंत खेळत राहिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशसाठी त्याने 119 प्रथम श्रेणी सामन्यात 40.80 च्या सरासरीने 7304 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 238 धावा होती. प्रथम श्रेणीत त्याने 21 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली. 1990-91, 1991-92 आणि 2000-01 प्रथम श्रेणी हंगामात त्याने 500 हून अधिक धावा फटकावल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या बॉलवर चौकार, पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक
खुरासियाने 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पेप्सी चषक स्पर्धेत भारताकडून एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. पदार्पणाच्या सामन्यात त्याने दुसर्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर 45 चेंडूत 57 धावांची त्याने खेळी केली. पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करणारा तो आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. पेप्सी कपमधील कामगिरीमुळे त्याला 1999 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले. पण त्याला खेळायची संधी मिळाली नाही.
कालांतराने त्याला संघातून वगळण्यात आलं. मात्र 2001 मध्ये अमय खुरासियाने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवलं. या वेळी पुन्हा श्रीलंकेविरुद्ध त्याला संधी मिळाली पण त्याची बॅट त्यावेळी बोलली नाही. त्यानंतर मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही.
12 वनडे सामने खेळून करिअर संपवलं
अमय खुरासियाने भारताकडून 12 एकदिवसीय सामने खेळले. त्याने 1999 मध्ये यापैकी 10 सामने खेळले. 13.54 च्या सरासरीने त्याने 149 धावा केल्या. जेव्हा खुरासिया निवृत्त झाला तेव्हा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकला नाही, याची खंत त्याच्या मनात होती. 2007 मध्ये त्याने क्रिकेटला गुड बाय केलं. यानंतर त्यांनी प्रशिक्षण आणि कॉमेंट्रीमध्ये आपली नवी इनिंग सुरु केली.
(left handed indian cricketer Amay Khurasiya cleared IAS Exam)
हे ही वाचा :
9 वर्षांत 4 डाव खेळला, चारही डावांत धडाकेबाज शतकं, ‘तोच’ संयमी पण तितकाच आक्रमक बॅट्समन कोण?
WTC फायनलमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्कार कोण पटकवणार?, 3 खेळाडू शर्यतीत, एका भारतीय खेळाडूची दावेदारी!
Team India ची डोकेदुखी ठरलेल्या Tim Southee ने पुन्हा चेतवलं, WTC फायनलअगोदर थेट कोहलीला इशारा