लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धा कुठे पाहता येईल? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग, संघ आणि वेळापत्रक
Legends League Cricket 2024 Date, Live Streaming: लीजेंड्स लीग स्पर्धेत आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. पण सामने कधी रंगणार आणि कुठे पाहता येणार याबाबत संभ्रम होता. चला या लीगबाबत सर्वकाही जाणून घेऊयात एका क्लिकवर
लीजेंड्स लीग स्पर्धेसाठी नुकताच लिलाव पार पडला. खाही खेळाडूंना चांगला भाव मिळाला, तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यामुळे या लिलावाची खूपच चर्चा रंगली. लीजेंड्स लीग स्पर्धेत यावेळी दिनेश कार्तिक आणि शिखर धवन खेळणार आहे. त्यामुळे स्पर्धेबाबतची उत्सुकता वाढली आहे. लींजेंड्स लीग स्पर्धेचं यंदाचं तिसरं पर्व आहे. ही स्पर्धा भारताच्या चार शहरात होणार आहे. जोधपूर, सूरत, जम्मू आणि श्रीनगरमध्ये खेळला जाणार आहे. अंतिम फेरीचा सामना श्रीनगरमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 20 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 16 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. एकूण 25 सामने या स्पर्धेत होणार आहेत यात एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. इंडिया कॅपिटल्स, हैदराबाद, गुजरात, कोणार्क सूर्या ओडिशा,मणिपाल टायगर्स, सदर्न सुपरस्टार्स असे सहा संघ आहेत.
मागच्या दोन पर्वात सुरेश रैना, आरोन फिंच, मार्टिन गप्टिल , सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर , ख्रिस गेल , हाशिम आमला, रॉस टेलर यासारखे दिग्गज खेळाडू खेळले आहेत. लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचे सह संस्थापक रमण रहेजा यांनी या हंगामाबाबत सांगितलं की, ‘लीजेंड्स लीग स्पर्धेचं आणखी एक पर्व पार पडणार आहे. आम्ही हे पर्व काश्मिरमध्ये खेळवण्यास उत्सुक आहोत. काश्मीरच्या लोकांना 40 वर्षात पहिल्यांदाच थेट क्रिकेट पाहण्याची संधी आहे.’
लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा कधीपासून सुरु होईल?
लीजेंड्स लीग स्पर्धा 20 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत असेल.
भारतात लीजेंड्स लीग स्पर्धेचे सामने कुठे पाहता येणार?
भारतात लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.
भारतात लीजेंड्स लीग स्पर्धा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रिमिंग फॅनकोड अॅपवर पाहता येईल.
लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेच्या कोणत्या गटात कोणता संघ?
लीजेंड्स लीग स्पर्धेत दोन गट आहेत. यात गट 1 मध्ये इंडिया कॅपिटल्स, कोणार्क सूर्याय ओडिशा आणि मणिपाल टायगर्स हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये गुजरात टीम, हैदराबाद आणि साउदर्न सुपरस्टार्स असतील.