लीजेंड्स लीग स्पर्धेचा थरार 20 सप्टेंबरपासून, धवन-कार्तिकसह या खेळाडूंकडे संघाची धुरा

लीजेंड्स लीग स्पर्धेचं स्वरुप गेल्या काही महिन्यात बदललं आहे. निवृत्त खेळाडूंची लीग असं आता स्वरूप राहिलेलं नाही. त्याला आता ग्लॅमर प्राप्त झालं आहे. दिनेश कार्तिक आणि शिखर धवनसारख्या खेळाडूंनी या स्पर्धेत रस दाखवला आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लीजेंड्स लीग स्पर्धेचा थरार 20 सप्टेंबरपासून, धवन-कार्तिकसह या खेळाडूंकडे संघाची धुरा
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 6:46 PM

लीजेंड्स लीग स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावात खेळाडूंसाठी लाखो रुपये मोजले गेले. आता सहा संघ सज्ज झाले असून 20 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 200 माजी खेळाडूभाग घेणार आहेत. या स्पर्धेत एकूण 25 सामने होणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण 10 सामने खेळणार आहे. म्हणजेच प्रत्येक रॉबिन राउंड पद्धतीने दोन वेळा आमनेसामने येणार आहे. या स्पर्धेतील टॉप 4 संघ बाद फेरी आणि इलिमिनिटेर स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएलप्रमाणे टॉप दोन संघ फायनलसाठी खेळतील. विजयी संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर पराभूत संघ इलिमिनेटर स्पर्धेतील विजेत्याची वाट पाहील. इलिमिनेटर फेरीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात लढत होईल. पहिल्या बाद फेरीत पराभूत झालेला संघ इलिमिनेटर स्पर्धेतील विजेत्या संघाशी खेळेल. यातून एका संघाची फायनलमध्ये वर्णी लागेल. ही स्पर्धा जोधपूर, सुरत, जम्मू आणि श्रीनगरमध्ये होणार आहे. अंतिम फेरी 16 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

इयान बेलकडे इंडिया कॅपिटल्स, शिखर धवनकडे गुजरात जायंट्स, इरफान पठाणकडे कोणार्क सूर्या ओडिशा, हरभजन सिंगकडे मनिपाल टायगर्स, दिनेश कार्तिककडे साउथर्न सुपरस्टार्सची धुरा सोपवण्यात आली आहे. तर अर्बनरायझर्स हैदराबादची धुरा सुरेश रैनाच्या खांद्यावर असेल.

लीजेंड्स लीग स्पर्धेतील सहा संघ

इंडिया कॅपिटल्स स्क्वाड: इयान बेल, ड्वेन स्मिथ, एश्ले नर्स, धवल कुलकर्णी, ध्रुव रावल, बरिंदर सरां, रवि बोपारा, परविंदर अवाना, नमन ओझाक, क्रिस्टोफर मोफू, इकबाल अब्दुल्लाह, किर्क एडवर्क्स, पंकज सिंह, पवन सुयाल, राहुल शर्मा, गणेश्वरा राव, फइज फजल, कॉलिन डी ग्रान्डहोम, भरत चिप्ली, बेन डंक

गुजरात जायंट्स: ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, मोर्ने वान विक, लँडल सिमंस, असोहर अफोहान, जेरोम टेलर, पारस खाडा, सीकुगे प्रसन्ना, कमाउ लेवररॉक, सायब्रँड एनोएलब्रेक्ट, शॅनन गॅब्रियल, समर क्वाड्री, मोहम्मद कैफ, श्रीसंत आणि शिखर धवन

कोणार्क सूर्या ओडिशा: इरफ़ान पठाण, यूसुफ़ पठाण, केविन ओ ब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनावीरा, शाहबाज़ नदीम, फिदेल एडवर्ड्स, बेन लॉफलिन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश पठानिया, केपी अपन्ना, अंबाती रायडू आणि नवीन स्टीवर्ट

मणिपाल टायगर्स: हरभजन सिंह, रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉटरेल, डॅन ख्रिश्चियन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असेला गुणरत्ने, सोलोमन मायर, अनुरीत सिंह, अबू नेचिम, अमित वर्मा, इमरान खान, राहुल शुक्ला, अमितोज़ सिंह, प्रवीण गुप्ता आणि सौरभ तिवारी

साउथर्न सुपरस्टार: दिनेश कार्तिक, एल्टन चिगुंबुरा, हॅमिल्टन मसाकाद्जा, पवन नेगी, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, श्रीवत्स गोस्वामी, हामिद हसन, नाथन कूल्टर नाइल, चिराग गांधी, सुबोथ भाटी, रॉबिन बिष्ट, जेसल कारी, चतुरंगा डी सिल्वा आणि मोनू कुमार.

अर्बनराइजर्स हैदराबाद: सुरेश रैना, गुरकीरत सिंह, पीटर ट्रेगो, समीउल्लाह शिनवारी, जॉर्ज वर्कर, इसुरु उदाना, रिक्की क्लार्क, स्टुअर्ट बिन्नी, जसकरन मल्होत्रा, चैडविक वाल्टन, बिपुल शर्मा, नुवान प्रदीप आणि योगेश नागर.

मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.