VIDEO : 6,6,6,4,4,4, Robin Uthappa चा पाकिस्तानच्या प्रोफेसवर हल्लाबोल, जाम धुतलं

| Updated on: Mar 15, 2023 | 9:45 AM

Legends league cricket : पाकिस्तानचा प्रोफेसर रॉबिन उथाप्पाच्या बॅटचा तडाखा कधी विसरणार नाही. धोनी प्रसिद्धीच्या झोतात असतानाच आता त्याच्या जुना मित्रही चर्चेत आलाय. सध्या लेजेंड्स लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु आहे.

VIDEO : 6,6,6,4,4,4, Robin Uthappa चा पाकिस्तानच्या प्रोफेसवर हल्लाबोल, जाम धुतलं
Robbin uthapa
Image Credit source: Llct20/Twitter
Follow us on

Legends league cricket : IPL 2023 टुर्नामेंट या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. या टुर्नामेंट आधी एसएस धोनीच्या तयारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नेट्समध्ये त्याने मारलेले सिक्स चर्चेचा विषय बनतायत. त्यामुळे आयपीएलबद्दल रोमांच वाढत चाललाय. धोनी प्रसिद्धीच्या झोतात असतानाच आता त्याच्या जुना मित्रही चर्चेत आलाय. सध्या लेजेंड्स लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु आहे. यामध्ये रॉबिन उथप्पाचा आक्रमक अंदाज पहायला मिळाला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

दोहा येथे ही टुर्नामेंट सुरु आहे. 14 मार्चल लेजेंड्स लीगमध्ये इंडिया महाराजा विरुद्ध एशिया लायन्सचा सामना झाला. या मॅचमध्ये धोनीचा मित्र रॉबिन उथप्पा आणि क्रिकेटचा प्रोफेसर मोहम्मद हाफीज आमने-सामने आले.

प्रोफेसरवर हल्लाबोल

दोहा येथील क्रिकेट फिल्डवर हे दोन्ही खेळाडू आमने-सामने आले. त्यावेळी एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. या मॅचमध्ये कुठल्या गोलंदाजाला इतकं फोडलं नाही, जितकी मोहम्मद हफीजला धुतलं. परिणामी 20 ओव्हरच्या या मॅचमध्ये तो आपल्या कोट्यातील 4 ओव्हरही टाकू शकला नाही.


बॅक टू बॅक 3 सिक्स

प्रोफेसर मोहम्मद हाफीजने फक्त 2 ओव्हर टाकल्या. त्याने 16.50 च्या इकॉनमीने 33 धावा दिल्या. यात त्याला 3 षटकार आणि 3 चौकार बसले. म्हणजे त्याने 30 धावा फक्त 6 चेंडूत दिल्या. यात बॅक टू बॅक 3 सिक्सचा व्हिडिओ चर्चेत आहे.

3 फोर, 3 सिक्स

हफीज विरुद्ध रॉबिन उथप्पाने 3 सिक्स मारले. त्याशिवाय 3 चौकारही लगावले. इंडिया महाराजाने त्याच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 30 धावा चोपल्या. उथप्पाने 5 सिक्स मारताना 39 चेंडूत नाबाद 88 धावा फटकावल्या.