उमेश यादव याला वडिलांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलं पत्र, म्हणाले..
उमेश यादव याच्या वडिलांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. उमेशने हे पत्र आपल्या ट्विटरवर शेअर केलं आहे.
मुंबई : भारताचा स्टार बॉलर उमेश यादव याच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला होता. उमेश यादवच्या वडिलांचं निधन झालं होतं. 22 फेब्रुवारीला त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. दुसऱ्या कसोटीनंतर त्याला घरी परतावं लागलं होतं. घरी गेल्यावर सर्व विधी उरकून तो पुन्हा तिसऱ्या कसोटीसाठी परतला होता. उमेश यादव याच्या वडिलांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. उमेशने हे पत्र आपल्या ट्विटरवर शेअर केलं आहे.
उमेश यादवचे वडील टिळक यादव यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. या कठीण काळात माझे विचार कुटुंबीय आणि शुभचिंतकांसोबत आहेत. वडिलांची सावली आणि आधार जीवनामध्ये महत्त्वाचा असतो. टिळक यादव यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे.
Thank you, Honourable Prime Minister @narendramodi ji, for your condolence message on the sad demise of my father?. This gesture means a lot to me and my family. pic.twitter.com/u68cE4e6Jn
— Umesh Yaadav (@y_umesh) March 3, 2023
उमेशने हे पत्र शेअर करताना म्हटलं आहे की, ‘माझ्या वडिलांच्या दुःखद निधनाबद्दल आपल्या शोकसंदेशाबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमचे आभार. 22 फेब्रुवारीला टिळक यादव यांच्या राहत्या घरी निधन झालं होतं. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर 22 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, इंदूर कसोटीमध्ये उमेश यादवने जबरदस्त कामगिरी केली होती. सामन्याच्या पहिल्या डावात 12 धावांत 3 महत्त्वाचे बळी घेतले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताला 9 विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारत 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसर्या कसोटीत उमेश यादवने विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यासोबतच त्याने भारतामध्ये 100 विकेट्सचं शतकही पूर्ण केलं होतं.