Gautam Gambhir | गौतम गंभीर याचा झंझावात, 24 तासात सलग 2 अर्धशतक
इंडिया महाराजा टीमचा कॅप्टन गौतम गंभीर याने सलग 2 सामन्यात अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.
दोहा | लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेतील दुसरा सामना हा वर्ल्ड जायंट्स विरुद्ध इंडिया महाराजा यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात गौतम गंभीर हा इंडिया महाराजाचं नेतृत्व करतोय. गंभीरने वर्ल्ड जायंट्स विरुद्ध शानदार अर्धशतक ठोकलंय. विशेष म्हणजे गंभीरची ही बॅक टु बॅक फिफ्टी ठरलीय. उल्लेखनीय बाब म्हणजे गंभीरचं गेल्या 24 तासांमधील दुसरं अर्धशतक ठरलंय.
गंभीरने अवघ्या 28 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. गंभीरने आशिया लायन्स विरुद्ध 10 मार्च रोजी झालेल्या सामन्यातही फिफ्टी केली होती.
गंभीरने वर्ल्ड जायंट्स विरुद्ध फिफ्टी ठोकल्यानंतर टॉप गिअर टाकत आणखी वेगाने फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र या नादात त्याने आपली विकेट गमावली. गंभीरने 41 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. गंभीरने ही खेळी वर्ल्ड जायंट्सने दिलेल्या 167 धावांच पाठलाग करताना केली.
त्याआधी 10 मार्च रोजी गंभीरने 54 धावांची खेळी केली. त्या सामन्यात एशिया लायन्स विरुद्ध त्याने 39 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली होती. मात्र या अर्धशतकानंतरही इंडिया महाराजाला सलामीच्या सामन्यात आशिया लायन्सकडून 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात आशिया लायन्सने विजयासाठी 166 धावांच आव्हान दिलं होतं. मात्र इंडिया महाराजाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 156 धावाच करता आल्या.
दरम्यान त्याआधी वर्ल्ड जायंट्सने टॉस जिंकून 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 166 धावा केल्या. वर्ल्ड जायंट्सकडून शेन वॉट्सन याने सर्वाधिक 55 धावा केल्या. कॅप्टन एरॉन फिंच याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. बेस्टने 13 धावांचं योगदान गिलं. या व्यतिरिक्त इंडिया महाराजाच्या गोलंदाजांनी वर्ल्ड जायंट्सच्या फलंदाजांना मैदानात टिकून दिलं नाही.
इंडिया महाराजाकडून हरभजन सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भज्जीने 2 ओव्हरमध्ये 13 धावा देत ही कामगिरी केली. तर मराठमोळ्या प्रणीण तांबे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच इरफान पठाण याने 1 विकेट घेतली आहे.
वर्ल्ड जायंट्स प्लेइंग इलेव्हन | आरोन फिंच (कॅप्टन), ख्रिस गेल, शेन वॉटसन, जॅक कॅलिस, रॉस टेलर, केविन ओ ब्रायन, मॉर्न व्हॅन विक (विकेटकीपर), टिनो बेस्ट, ब्रेट ली, मॉन्टी पानेसर आणि ख्रिस मपोफू
इंडिया महाराजा प्लेइंग इलेव्हन | गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मुरली विजय, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, अशोक दिंडा आणि प्रवीण तांबे.