Shikhar Dhawan: शिखर धवनचं विस्फोटक अर्धशतक, गब्बरची तडाखेदार खेळी

Southern Super Stars vs Gujarat Greats Legends League Cricket 2024: गब्बर शिखर धवन याने सदर्न सुपर स्टार्स विरुद्ध धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. शिखरचं लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.

Shikhar Dhawan: शिखर धवनचं विस्फोटक अर्धशतक, गब्बरची तडाखेदार खेळी
Shikhar dhawan llc 2024Image Credit source: LLC X Account
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 11:06 PM

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर शिखर धवन लेजेंड्स क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत सहभागी झाला आहे. शिखर धवन या स्पर्धेत गुजरात ग्रेट्स संघाचं नेतृत्व करतोय. शिखरने या स्पर्धेतील चौथ्या आणि गुजरातच्या दुसऱ्याच सामन्यात तडाखेदार खेळी केली आहे. शिखरने सदर्न सुपर स्टार्स विरुद्ध 145 धावांचा पाठलाग करताना विस्फोटक अर्धशतक ठोकलं आहे. शिखर धवनने या अर्धशतकासह त्याला गब्बर का म्हणतात? हे सिद्ध करुन दाखवलं.

पवन नेगी याने गुजरातच्या डावातील 13 वी ओव्हर टाकली. शिखरने या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 1 धाव घेत या स्पर्धेतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. धवनने 37 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 135.14 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. शिखरला अर्धशतकानंतर संघाला विजय मिळवून देत नाबाद परतण्याची संधी होती. मात्र शिखर अर्धशतकानंतर 11 बॉल खेळल्यानंतर आऊट झाला. शिखरला या 11 चेंडूत फक्त 2 धावाच जोडता आल्या. शिखर 48 बॉलमध्ये 52 रन्स करुन बाद झाला. चतुरंगा डी सिल्वा याने लकमलच्या हाती धवनला कॅच आऊट केलं.

गुजरात ग्रेट्ससमोर 145 धावांचं आव्हान

दरम्यान सदर्न सुपर स्टार्सने त्याआधी सामन्यातील पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 144 धावांपर्यंत मजल मारली. चतुरंगा डी सिल्वा याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. चतुरंगा याने नाबाद 53 धावा केल्या. तर मार्टिन गुप्टील 22, मसाकादझा 20 आणि कॅप्टन दिनेश कार्तिक याने 18 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना काही खास करता आलं नाही. गुजरात ग्रेट्सकडून मनन शर्मा याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर लियाम प्लंकेट आणि प्रसन्ना या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

शिखर धवनचा अर्धशतकी तडाखा

सदर्न सुपर स्टार्स प्लेइंग इलेव्हन : दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मार्टिन गुप्टिल, पार्थिव पटेल, हॅमिल्टन मसाकादझा, केदार जाधव, चिराग गांधी, पवन नेगी, चथुरंगा डी सिल्वा, सुबोथ भाटी, सुरंगा लकमल आणि मोनू कुमार.

गुजरात ग्रेट्स प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कर्णधार), लेंडल सिमन्स, मोहम्मद कैफ, असगर अफगाण, मॉर्न व्हॅन विक (विकेटकीपर), मनन शर्मा, कामाऊ लेव्हरॉक, सीकुगे प्रसन्ना, एस श्रीशांत, लियाम प्लंकेट आणि शॅनन गॅब्रिएल.

'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.