Babar Azam | बाबर आझमने LPL मध्ये शतक ठोकत रचला इतिहास, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

Lanka Premier League 2023 | लंका प्रीमिअर लीग 2023 मध्ये बाबर आझम याने तडाखेदार बॅटिंग करत खणखणीत शतक ठोकलं.

Babar Azam | बाबर आझमने LPL मध्ये शतक ठोकत रचला इतिहास, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 9:28 PM

कोलंबो | पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम हा सध्या लंका प्रिमियर लीगमध्ये खेळतोय. बाबरने एलपीएलमध्ये विस्फोटक खेळी करत T 20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे बाबर आझम टी 20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसराच बॅट्समन ठरलाय. एलपीएलमधील दहाव्या सामन्यात कोलंबो स्टायकर्स गाले टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात बाबर आझमने कोलंबो स्टायकर्स टीमकडून खेळताना गाले टायटन्स विरुद्ध शतकी खेळी केली. विशेष म्हणजे बाबरने चेसिंग करताना हे शतक ठोकलं.

गॉल टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना कोलंबो स्टायकर्ससमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना बाबर आझमने ताबडतोड फलंदाजी करत शतक ठोकले. बाबरच्या या खेळीमुळे कोलंबोने सहज विजय मिळवला.

बाबरने 8 चौकार आणि 5 षटकारांसह 59 चेंडूत 104 धावा केल्या. या शतकाच्या मदतीने त्याने T20 मध्ये आपल्या नावे एक नवा विक्रम रचला. बाबरच्या टी 20 कारकीर्दीतील हे दहावं शतक ठरलं. बाबर आजम याने शतकासह इतिहास रचला आहे. बाबर टी 20 क्रिकेटमध्ये 10 शतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरलाय.

दरम्यान याआधी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ‘युनिव्हर्स बॉस’ अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याने ही कामिगरी केली होती. गेलने त्याच्या T20 कारकिर्दीत एकूण 22 शतकं ठोकली आहेत. ख्रिस गेल याच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. त्यानंतर विराट कोहली , एरॉन फिंच आणि डेविड वॉर्नर तिघांनी आतापर्यंत T20 मध्ये प्रत्येकी 8 शतके ठोकली आहेत.

बाबर आझम गेली काही वर्ष ग्लोबल कॅनडा लीग मध्ये खेळत होता. मात्र बाबर यंदा थेट लंका प्रिमियर लीगमध्ये सहभागी झालाय. आगामी आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जोरदार सराव व्हावा, या उद्देशाने बाबरने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आलंय. बीसीसीआयचा टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात विरोध आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने होणार आहे. आशिया कपमध्ये एकूण 6 संघांमध्ये 13 सामने होणार आहेत. या 13 पैकी 4 सामने पाकिस्तान आणि उर्वरित श्रीलंकेत पार पडणार आहेत. त्यामुळे आगामी आशिया कपमध्ये बाबरला लंका प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याचा फायदा होऊ शकतो.

कोलंबो स्टाइकर्स प्लेइंग 11 | निरोशन डिकवेला (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, पाथुम निसांका, नुवानिदू फर्नांडो, मोहम्मद नवाज, लाहिरू उदारा, चमिका करुणारत्ने, रमेश मेंडिस, नसीम शाह, लक्ष संदकन आणि मथीशा पाथिराना.

गाल्ले टायटन्स प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), शेवोन डॅनियल, लसिथ क्रुसपुल्ले, भानुका राजपक्षे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), शकीब अल हसन, अकिला धनंजया, कसून राजिथा, मिनोद भानुका, तबरेझ शम्सी आणि रिचर्ड नागरावा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.