LSG vs DC : लखनऊ दिल्ली विरुद्ध सामन्यात टॉसचा बॉस, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी?
Lucknow Super Giants vs Delhi Capitals Toss : लखनऊ सुपर जांयट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात 'रन'संग्राम होणार आहे. लखनऊने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनऊने टॉस जिंकला. कॅप्टन केएल राहुल याने दिल्ली विरुद्ध पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघात बदल
लखनऊ आणि दिल्ली दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. लखनऊने एक बदल केला आहे. मयंक यादव बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अर्शद खान याला संधी देण्यात आली आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सने 2 बदल केले आहेत. मुकेश कुमार आणि कुलदीप यादव या दोघांचं कमबॅक झालं आहे. या सामन्यानिमित्ताने लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघांची यंदाच्या मोसमातील कामगिरी कशी आहे? हे जाणून घेऊयात.
लखनऊ आणि दिल्लीची कामगिरी
लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुल याच्या नेतृत्वात आतापर्यंत या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. लखनऊने शेवटच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सचा विजयी ट्रॅकवर प्रयत्न असणार आहे. यंदा दिल्लीने ऋषभ पंतच्या नेतृत्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. दिल्लीने चेन्नई सारख्या मजबूत संघाविरुद्ध एकमेव सामना जिंकला. मात्र 4 सामन्यात दिल्लीला पराभूत व्हावं लागलं. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या 10 व्या स्थानी आहे.
लखनऊने दिल्ली विरुद्ध टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bat against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/0W0hHHG2sq#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/1MQFaSJ8my
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि यश ठाकुर.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.