LSG vs MI Eliminator IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या लखनऊवरील विजयात MS Dhoni च असंही योगदान

| Updated on: May 25, 2023 | 8:47 AM

LSG vs MI Eliminator IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या विजयाला एमएस धोनीनेही हातभार लावला. धोनीने नकळतपणे मुंबईच्या विजयाला हातभार लावला. तुम्ही म्हणाल मुंबईच्या लखनऊवरील विजयाचा धोनीशी काय संबंध?

LSG vs MI Eliminator IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या लखनऊवरील विजयात MS Dhoni च असंही योगदान
IPL 2023
Follow us on

चेन्नई : मुंबई इंडियन्सने काल एलिमिनेटरच्या महत्वाच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर मोठा विजय मिळवला. मुंबईने लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. मुंबईने पहिली बॅटिंग करताने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 182 धावा केल्या. मुंबईच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची टीम 101 धावात ढेपाळली. मुंबईने काल फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये सरस कामगिरी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

या सीजनमध्ये दुबळी गोलंदाजी मुंबई इंडियन्सची मुख्य समस्या ठरली आहे. त्यामुळे अनेक प्रतिस्पर्धी टीम्सनी मुंबई विरुद्ध सहज 200 धावांचा डोंगर उभारला होता. कालच्या सामन्यात मात्र मुंबईचा कच्चा दुवाच बलस्थान बनला.

मुंबईच्या विजयात धोनीच योगदान कसं?

आकाश मढवालने 5 विकेट काढून जबरदस्त गोलंदाजी केलीच. पण त्याला मुंबईच्या अन्य गोलंदाजांनी सुद्धा योग्य साथ दिली. मुंबई इंडियन्सने काल लखनऊ सुपर जायंट्सवर मिळवलेल्या मोठ्या विजयात सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनीच सुद्धा योगदान आहे. धोनीने नकळतपणे मुंबईच्या विजयाला हातभार लावला. तुम्ही म्हणाल मुंबईच्या लखनऊवरील विजयाचा धोनीशी काय संबंध?

मुंबईच पहिलं प्राधान्य कशाला असतं?
त्याच असं आहे की, क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. चेपॉकवर खेळताना टॉसची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची होती. मुंबई इंडियन्सच्या टीमच नेहमी पहिली क्षेत्ररक्षण करायला प्राधान्य असतं. मुंबईची टीम धावांचा पाठलाग करताना जास्त चांगली खेळते. याच कारण आहे मुंबईकडे असणारे पावर हिटर्स. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चालू सीजनमध्ये 200 पेक्षा जास्त धावांच लक्ष्य आरामात पार केलय.

ऋतुराज गायकवाड काय म्हणालेला ?

काल मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खरंतर रोहित टार्गेट चेस करण्याला प्राधान्य देतो. रोहितने टॉस जिंकून बॅटिंग निवडली, त्यामागे तसच कारण सुद्धा आहे. ऋतुराज गायकवाडने क्वालिफायरच्या सामन्यानंतर पीच बद्दल महत्वाच वक्तव्य केलं होतं. 3-4 मॅचआधी चेन्नईची विकेट वेगळी होती आणि आता वेगळी आहे, असं ऋतुराज म्हणाला होता.

कुठली गोष्ट धोनीच्या नंतर लक्षात आली?

CSK चा कॅप्टन एमएस धोनी स्वत: दोनवेळा पीचच्या बाबतीत फसलाय. चेपॉकच्या ज्या विकेटवर पहिला क्वालिफायर सामना झाला, त्यावर धोनीला पहिली गोलंदाजी करायची होती. कारण नंतर दवाचा फॅक्टर महत्वाचा ठरतो. पण दव पडलाच नाही, तेव्हा टॉस हरण्याचा निर्णय पथ्यावर पडल्याच धोनीच्या लक्षात आलं. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने हीच बाब ध्यानात घेऊन टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण नंतर दुसऱ्या इनिंगमध्ये चेन्नईची विकेट स्लो होते.